घरताज्या घडामोडीVideo: अजगराला पकडून त्याला लाथेने तुडवलं, सेल्फी काढला; टवाळांना अटक

Video: अजगराला पकडून त्याला लाथेने तुडवलं, सेल्फी काढला; टवाळांना अटक

Subscribe

मुंबईच्या बोरीवली विभागातील काजूपाडा येथे एका अजगराला (Rock Python) लाथेने तुडविल्याबद्दल दोन टवाळखोरांना वनविभागाने अटक केली आहे. या टवाळखोरांनी पावसात वाहून आलेल्या अजगराला पकडून त्यासोबत सेल्फी काढत नृत्य केले होते, तर काहींनी या मुक्या प्राण्याला लाथेने तुडवले होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींकडून या टवाळांना अटक करण्याची मागणी केली जात होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या अजगराची लांबी ८.५ फूट असून आता या अजगराला जंगलात सोडून देण्यात आले आहे.

ही घटना काजूपाडा परिसरातील हनुमान टेकडी येथे घडली आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आहे. बुधवार आणि गुरुवार रोजी मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. या पावसात एक अजगर मानवी वस्तीत वाहून आला होता. हनुमान टेकडी येथील काही टवाळांनी या अजगराला पकडले. अजगराचे तोंड गच्च पकडून त्याला एका गोणीत भरण्यात आले होते. त्यानंतर या अजगराला खांद्यावर नाचवत या मुलांनी त्याला क्रूर अशी वागणूक दिली. तर काही तरुणांनी या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

- Advertisement -

प्राणी हक्क कार्यकर्ते पवन शर्मा यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही म्हणजे Resqink Association for Wildlife Welfare (RAWW) यांच्यावतीने या मुलांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आणि या टवाळांना शोधून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या त्यांची चौकशी सुरु असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Posted by Pawan Sharma on Thursday, August 6, 2020

- Advertisement -

अटक केलेल्या दोन तरुणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव प्राणीमित्रांकडून यानिमित्ताने नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात आले की, “अशाप्रकारचे सर्प किंवा प्राणी आढळून आल्यास सर्वात आधी वनविभागाला माहिती द्या, त्या प्राण्याला क्रूर वागणूक देऊ नका.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -