घरनवी मुंबईनवी मुंबईत राष्ट्रवादीच्या 10 तालुकाध्यक्षांसह 2 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या 10 तालुकाध्यक्षांसह 2 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद कमी झाली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान,  अशोक गावडेंनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे.

- Advertisement -

गावडेंनी पक्षसोडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी केली होती नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा –

नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असे ते म्हणाले. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरले आहे. त्यांनी मला यानंतर होय मी पक्ष सोडणार आहे असे म्हटल्याचे आव्हाड यांनी सांगितले. ते जर पक्ष सोडणार असतील तर त्या ठिकाणी दुसरा अध्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. मी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आता ते पक्ष सोडणार, अध्यक्ष हा द्यावाच लागतो त्यामुळे नामदेव भगत यांची नियुक्ती केल्याची घोषणा करतो असे आव्हाड यांनी म्हटले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -