नवी मुंबई-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर काही दिवसांपुर्वी नियोजना विषयक बैठक घेतली होती. गणेशोत्सव मंडळांना पालिकेने परवाना घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. परिमंडळ १ व २ मधून एकुण २१४ अर्जांपैकी १८५ गणेश मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
शासन व नवी मुंबई महापालिकेने यापूर्वीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले होतेे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे.पालिकेने मंडळांसाठी ऑनलाईन विविध परवाना घेण्याचे आवाहन केले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला पालिकेकडे दिलेल्या मुदतीत परिमंडळ-१ मधून १०४ अर्ज आले होतेे.तर परिमंडळ-२ मधून ११० अर्ज प्राप्त झाले होते.
नोडनुसार सार्वजनिक मंडळे
परिमंडळ-१-: बेलापूर-२८,नेरुळ-२४,वाशी-१७, तुर्भे-२१
परिमंडळ-२ -: दिघा-१०, ऐरोली-२७,घणसोली-१०, कोपरखैरणे-४८
१३९ कुत्रिम तलाव
बाप्पाच्या उत्सवानंतर विसर्जनासाठी देखील पालिकेने तयारी पुर्ण केली आहे. आठही नोडमध्ये १३९ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे नैसर्गिक २२ विसर्जन स्थळी पालिकेकडून सोयी सुविधा,मूर्ती विसर्जनस्थळी तराफा, सुके व ओले निर्माल्य कलश व्यवस्था,विद्यृत व्यवस्था, वैद्यकीय व अग्निशमक दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
‘श्रीगणेशोत्सव २०२३’ च्या निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांबरोबरच पालिकेची यंत्रण तैनात झाली आहे. मंडळांनी उत्साहात पर्यावरणाचे भान ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा.पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करुन पर्यावरणाचा समतोल राखावा.नागरिकांनी सहकार्य करावे.
-राजेश नार्वेकर, आयुक्त नमुंमपा