घरनवी मुंबईजिल्ह्यातील १,८९,९९५ विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

जिल्ह्यातील १,८९,९९५ विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

Subscribe

सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

अलिबाग: सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ९९५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पहिले ते पाचवीपर्यंत १ लाख १६ हजार ८६२ विद्यार्थ्यांसाठी तर सहावी ते आठवीपर्यंतच्या ७३ हजार १३३ विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -