घरनवी मुंबईप्रभागनिहाय स्वच्छता कार्याला गती द्या - आयुक्त अभिजीत बांगर

प्रभागनिहाय स्वच्छता कार्याला गती द्या – आयुक्त अभिजीत बांगर

Subscribe

'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा निश्चय केला असताना त्यामध्ये घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे आणि महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये हा कचरा वेगवेगळा दिला जाणे आत्यंतिक महत्वाचे आहे. द

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा निश्चय केला असताना त्यामध्ये घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे आणि महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये हा कचरा वेगवेगळा दिला जाणे आत्यंतिक महत्वाचे आहे. दररोज ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती करणा-या सोसायट्या, वसाहती आपल्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रीया प्रकल्प राबवित आहेत याकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकारी, कर्मचारी वृंदाला दिले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ संबंधीत कामांचा विभाग कार्यालय निहाय आढावा घेण्यास आयुक्तांनी सुरुवात केली. बुधवारी त्यांनी वाशी व तुर्भे विभाग कार्यालयामध्ये स्वच्छता विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक प्रभागासाठी विभाग कार्यालय पातळीवर अधिकारी, कर्मचारी यांची पथके नेमण्यात आली असून त्यांनी कचरा वर्गीकरण, संकलन व विल्हेवाट याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे व याबाबत नियमित जनजागृती करत रहावी असे आयुक्तांनी सूचित केले. सोसायट्यांच्या बाहेर ओला, सुका व घरगुती घातक कच-यासाठी हिरव्या, निळ्या व लाल रंगाच्या कचरापेट्या असाव्यात. तसेच सोसायट्यांप्रमाणेच गावठाण व झोपडपट्टी भागातही घरांमध्येच कचऱ्याचे वर्गीकरण केले जावे व घराघरातून कचरा वेगवेगळा संकलीत करावा आणि याकरिता छोट्या गाड्या, वाढीव मनुष्यबळ उपयोगात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

- Advertisement -

गांवठाण व झोपडपट्टी भागात डायपर, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी, सेल, डासनाशक, रंगांचे डबे, स्वच्छता साहित्य अशा प्रकारचा घरगुती घातक कचरा योग्य प्रकारे संकलीत करण्यासाठी तेथे मध्यवर्ती ठिकाणांवर लाल रंगांच्या कचरापेट्या ठेवाव्यात व नागरिकांना त्याची व्यापक प्रमाणात माहिती द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. घराघरातून कचरा संकलीत झाला तर कचराकुंडीमुक्त शहर करता येईल हे लक्षात घेऊन त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करतानाच कचराकुंड्या काढून टाकल्यानंतर ती जागा सुशोभित करून त्याठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, यासाठी सीसीटिव्ही अथवा प्रत्यक्ष व्यक्तींमार्फत लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपल्या घरातच खत टोपलीचा कंपोस्ट बास्केटचा वापर करून घरातील ओल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभागनिहाय नेमलेल्या पथकांमार्फत नागरिकांना प्रोत्साहीत करावे व त्यामध्ये सातत्य राखावे असेही आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा –

बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळतेय; मनसेचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -