घरनवी मुंबईपनवेलमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

पनवेलमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

Subscribe

पनवेल येथील आरटीओने बेशिस्त आणि नियमभंग करीत वाहन चालवणार्‍या रिक्षा चालकांवर गुरुवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वर्दी न घालणे, बॅच न लावणे, मीटर प्रमाणे रिक्षा न चालवणे, लायसन्स नसणे आदीप्रकारे नियमबाह्य वर्तन करणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी परिसरात आरटीओने रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पनवेल: येथील आरटीओने बेशिस्त आणि नियमभंग करीत वाहन चालवणार्‍या रिक्षा चालकांवर गुरुवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वर्दी न घालणे, बॅच न लावणे, मीटर प्रमाणे रिक्षा न चालवणे, लायसन्स नसणे आदीप्रकारे नियमबाह्य वर्तन करणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी परिसरात आरटीओने रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला आहे तर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, पनवेल रेल्वे स्टेशनवर रिक्षा वाहन चालक एकत्र करून त्यांना रस्ता सुरक्षाचे महत्व व प्रवाशांसोबत सौजन्याने वागण्यासंदर्भात व मीटर प्रमाणे भाडे आकारणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

रिक्षांची विशेष तपासणी मोहीम
गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटो रिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पनवेल रेल्वे स्टेशन ईस्ट साईड, पनवेल रेल्वे स्टेशन वेस्टसाइड, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, मानसरोवर रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला.

- Advertisement -

एकूण १२३ रिक्षा दोषी
या मोहिमेअंतर्गत एकूण ४१५ वाहने तपासली. व तपासणी अंतर्गत एकूण १२३ दोषी रिक्षा आढळल्या तर एकूण १५ वाहने विविध ठिकाणी अटकावून ठेवली. या तपासणी मोहिमे अंतर्गत मीटर प्रमाणे भाडे नाकारणे, मीटर सील नसणे, मीटर सदोष, रिफ्लेक्टर नाही, जादा प्रवासी, प्रवाशांची उद्धटपणे वागणे, भाडे नाकारणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, परवाना नाही इत्यादी कारणासाठी ही तपासणी मोहिम राबवण्यात आली होती. सर्व कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -