पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी नारायण घरत; सोनावणे उपसभापती

कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदी नारायण घरत तर उपसभापती पदी सुनील सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी भारती काटुळे यांनी काम पाहिले.

पनवेल: कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदी नारायण घरत तर उपसभापती पदी सुनील सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी
निवडणूक कार्यक्रम प्राधिकृत अध्यासी अधिकारी भारती काटुळे यांनी काम पाहिले.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १७ जागांवर बिनविरोध विजय मिळवला असल्याने सभापती आणि उपासभापती पदावर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होणार हे जवळपास निश्चित असल्याने बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विजयाची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयी मिरवणूकीने आपला आनंद व्यक्त केला. या प्रसंगी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा सल्लागार बबन पाटील,जे.एम. म्हात्रे,सुदाम पाटील,काशिनाथ पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.