Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईAnkush Kadam : घणसोलीत सभेत घराणेशाही, प्रस्थापितांविरोधात संभाजीराजे छत्रपती कडाडले, भवितव्यासाठी अंकुश...

Ankush Kadam : घणसोलीत सभेत घराणेशाही, प्रस्थापितांविरोधात संभाजीराजे छत्रपती कडाडले, भवितव्यासाठी अंकुश कदम योग्य उमेदवार

Subscribe

नवी मुंबई : व्हाईट हाऊसची दहशत संपवायला अंकुश कदम यांना ताकद द्या, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी घणसोलीतील महापरिवर्तन सभेत रविवारी केले. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडण्यासाठी शिवछत्रपतींनी विस्थापितांना सोबत घेऊन स्वराज्य घडवले तसेच हे स्वराज्य घडवायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पाच वर्षांत जे राजकारण घडले ते पुन्हा घडू नये, यासाठी अंकुश कदम यांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अंकुश सखाराम कदम यांच्या प्रचारासाठी घणसोलीत महापरिवर्तन सभा घेण्यात आली होती. यावेळी धनगर समाजाने संभाजीराजे यांना घोंगडी देत सन्मान केला आणि अंकुश कदम यांना पाठिंबा दिला.

हेही वाचा…  Ankush Kadam : शिवरायांचे स्वराज्य ऐरोलीत आणणार, ऐरोलीचे उमेदवार अंकुश कदम यांची ग्वाही

- Advertisement -

आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट

मी छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने अठरापगड जाती आणि १२ बलुतेदारांना एकत्र घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कुणाच्या हक्काचे आरक्षण काढायचे नाही मात्र, स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपण दाखवून देऊ शकतो की ५० टक्क्यांच्या आतले आरक्षण देऊ शकतो. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. अंकुश कदम आमदार झाल्यावर विधानसभेत ते हा मुद्दा उचलून धरतील. स्वराज्य पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो आरक्षणावर ठाम भूमिका मांडत आहे. आम्हाला मायक्रो ओबीसींनाही न्याय द्यायचा आहे. धनगर आरक्षणाला देखील समर्थन देत आहोत, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. यावेळी मराठा उमेदवार राजीव भोसले यांनी निवडणुकीतून माघार घेत समाजाचे सक्षम उमेदवार असलेल्या अंकुश कदमांच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहण्याचे आवाहन केले.

अंकुश कदम यांचे विकासाचे व्हिजन

रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, उत्तम आरोग्य व्यवस्था, उच्च दर्जाचे शिक्षण, माथाडी-कष्टकरी कामगारांचे प्रश्न यासह अनेक मुद्यांवर भाष्य करत सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचे अंकुश कदम यांनी विकासाचे व्हिजन मांडताना स्पष्ट केले. इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आमदार, खासदार केले पण तुमच्या मुलांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका करत तुमच्या मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वराज्य कटीबद्ध असल्याचे अंकुश कदम यांनी स्पष्ट केले. संभाजीराजे छत्रपती यांच्या रॅलीमुळे ऐरोलीतील राजकीय वारे बदलण्याची चर्चा होत आहे.

- Advertisement -

सोमवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ऐरोली विधानसभा मतदारसंघात अंकुश कदम यांचा झंझावात पाहायला मिळाला. त्यांच्या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -