Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईAnkush Kadam : ऐरोली मतदारसंघात स्वराज्यची प्रचारात मुसंडी, अंकुश कदम यांच्या पहिल्या...

Ankush Kadam : ऐरोली मतदारसंघात स्वराज्यची प्रचारात मुसंडी, अंकुश कदम यांच्या पहिल्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

ऐरोली : विधानसभा निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरत असतानाच ऐरोली मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यांनी कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, दिघा, ऐरोली या सर्व भागात पहिली प्रचार फेरी पूर्ण केली असून नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ऐरोली मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक आणि अपक्ष विजय चौगुले असे दिग्गज उमेदवार असूनही अंकुश कदम अत्यंत शिस्तीत प्रचार पूर्ण करत आहेत. मतदारांची घरोघरी भेट घेण्यावर अंकुश कदम यांचा भर आहे. मॉर्निंग वॉक, संवाद मेळाव तसेच प्रचार फेऱ्या आणि बैठकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे.

हेही वाचा…  Sharad Pawar : भुजबळांना मुख्यमंत्री का केले नाही? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

- Advertisement -

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या दिघा ते जुहूगाव या बाईक रॅलीलादेखील तरुणांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून हजारो तरुण आणि नवी मुंबईकर या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही बाईक रॅली नसून अंकुश कदम यांच्या विजयाची रॅली असल्याचे प्रतिक्रिया यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. खुद्द संभाजीराजे ऐरोली विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून अंकुश कदम यांच्या पाठीशी उभे आहेत.

दरम्यान, आपली लढाई प्रस्थापितांविरोधात असल्याचे अंकुश कदम यांनी स्पष्ट केले आहे. वर्षानुवर्षे सत्ता भोगून घराणेशाहीने आपल्या मुलांना आणि घरातल्यांना महत्त्वाची पदे देणाऱ्याविरोधात येथील जनता असून या प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी आपण सज्ज आहोत, असे अंकुश कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisement -

ऐरोलीमध्ये स्वराज्य येणार

ऐरोली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य पुन्हा येणार आणि महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा विकास ऐरोलीमध्ये माझ्या हातून घडणार, असा विश्वास अंकुश कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -