Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईAnkush Kadam : अंकुश कदम यांच्यासाठी घणसोलीत संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि...

Ankush Kadam : अंकुश कदम यांच्यासाठी घणसोलीत संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी कडाडणार, ऐरोली मतदारसंघाची रविवारी दिशा ठरणार

Subscribe

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अंकुश सखाराम कदम यांच्यासाठी रविवार म्हणजे निवडणूक प्रचाराचा सुपर संडे आहे. रविवारी (17 नोव्हेंबर) त्यांच्या प्रचारासाठी घणसोलीमध्ये प्रचंड मोठी सभा होणार असून खुद्द महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मतदारांना अंकुश कदम यांना मतदानाचे आवाहन करताना विरोधकांवर कसे कडाडणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

घणसोलीतील सिम्प्लेक्स येथील नवी मुंबई महापालिकेच्या कै. संजय बालाजी पाटील क्रीडांगणावर भव्य महापरिवर्तन सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी स्वराज्य पक्षाकडून करण्यात आली असून हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अगोदर कोपरखैरणेत संयोगिताराजे छत्रपती यांची भव्य सभा झाली होती. तसेच बाईक रॅलीने सर्वांचे डोळे दीपवले होते. त्यामुळे या सभेतून ऐरोली विधानसभा निवडणुकीची दिशा ठरून मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने, हे कळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Ankush Kadam : ऐरोली मतदारसंघात मराठा फॅक्टरकडून चमत्काराची अपेक्षा, अंकुश कदम यांचा किती फायदा होणार

छत्रपती संभाजीराजे हे शिवछत्रपतींचे वंशज असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि मराठा समाजावर त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा शेतकरी वर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली पट्ट्यातून येणाऱ्या लोकांवर चांगला प्रभाव आहे. तर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या सडेतोड भाषणाची शैली अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातील सुसंस्कृत पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या परिवर्तन सभेमुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील राजकीय वारे फिरू शकते. ऐरोली मतदारसंघातील ही सभा नाईक आणि चौगुले यांना आव्हान देणारी तर ऐरोली आणि महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन ठेवणारी असेल, असे मत स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -