Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई बेलापूरात प्रवेशद्वाराची कमान कोसळली

बेलापूरात प्रवेशद्वाराची कमान कोसळली

कमान उभारण्याचे काम सुरू असतानाच घडली दुर्घटना

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेकडून गावांची ओळख सांगणार्‍या कमाननी गावाच्या प्रवेशद्वारावर काम सध्या सुरु आहे. बेलापूर गावाला लागून असलेल्या वेशीवरच ही कमान उभारण्याचे काम सुरु होते. मात्र, रविवारी भर पावसात काम सुरू असताना अचानक कमानीचा काही भाग कोसळू लागला आणि क्षणातच संपूर्ण कमान कोसळून पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

या दुर्घटनेत ६ कामगार जखमी झाले असून या सर्व जखमींना नेरुळ मधील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. काही दिवसापूर्वीच बेलापूर इथल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या टेहळणी बुरुजाचा काही भाग पावसामुळे कोसळला होता. त्यातच आता बेलापूर गावाच्या कमानीचे बांधकाम कोसळल्यामुळे एकूणच बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -