घरनवी मुंबईवाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून 'ति'चा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तपासात उघड

वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून ‘ति’चा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तपासात उघड

Subscribe

तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड

वाशी रेल्वे खाडी पुलाजवळ जखमी अवस्थेत मिळून आलेल्या २५ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जखमी अवस्थेत जेजे रूग्णालयात उपचार घेणाऱ्या या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मी लोकल ट्रेनच्या दारात उभी असतांना तोल जाऊन पडले, तसेच तिच्यासोबत कुठल्याही प्रकारचा अत्याचार झालेला नसल्याचे तिच्या जबाबात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात २५ वर्षीय तरुणीच्या मित्राने तिच्यासोबत लग्नाला नकार दिल्यामुळे तिला नैराश्य आले होते. या नैराश्यातून तिने दादर रेल्वे स्थानकावर प्रथम आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तेथील सफाई कर्मचारी महिलांनी तिला धीर दिला आणि समजावून घरी जाण्यास सांगितले होते. त्यानंतर ती कुर्ला येथून वाशी स्थानकात आली होती. तेथून कुर्ल्याकडे परतत असतांना तिने नैराश्यात असताना ट्रेन मधून उडी घेतली. सुदैवाने त्यात ती बचावली.

- Advertisement -

जखमी तरुणीचे कुटुंब टिटवाळा येथे राहण्यास असून ती पवई येथे घरकाम करून तेथेच राहण्यास होती. तिला हे घरकाम मिळवून देणाऱ्या तरुणासोबत तिचे प्रेमप्रकरण असल्याचेही समोर येत आहे.

पोलिसांच्या तपासात निष्पन्न

वाशी येथे धावत्या लोकलमधून एका २५ वर्षीय तरूणीला ढकलून देण्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेत तरूणी गंभीररित्या जखमी झाली होती. तरूणीला उपचारांसाठी मुंबईच्या जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असणाऱ्या वाशी खाडी पुलाजवळ बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी जखमी अवस्थेत तरूणी पोलिसांना सापडली होती. या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याच्या उद्देशातून तिला धावत्या ट्रेनमधून ढकलण्यात आले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता २५ वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.


धक्कादायक: वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून तरूणीला ढकलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -