घरनवी मुंबईबेलापूर मरिना प्रकल्पास लवकरच सुरुवात

बेलापूर मरिना प्रकल्पास लवकरच सुरुवात

Subscribe

देशातील दुसरा व राज्यातील पहिला असा नवी मुंबईतील महत्वाकांक्षी अशा मरिना प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथे सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असा मरिना प्रकल्प उभारण्याची आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मागणी केली होती.

देशातील दुसरा व राज्यातील पहिला असा नवी मुंबईतील महत्वाकांक्षी अशा मरिना प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथे सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असा मरिना प्रकल्प उभारण्याची आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मागणी केली होती. तसेच शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभेतही लक्षवेधी व औचित्याच्या मुद्द्यांद्वारे आवाज उठवून मरिना प्रकल्पाच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली होती. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनीही २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मरिना प्रकल्प उभारणीबाबत हिरवा कंदील दिला होता. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटी पर्यावरण विभागाकडून तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयानेही त्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पास सुरुवात होणार असल्याने नवी मुंबई शहराला अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सीबीडी-बेलापूर सेक्टर १५ येथील भूखंड क्र. १११ ए, अंदाजित क्षेत्रफळ ७.२५ एकर जागेचा ताबा सिडकोने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला काही अटी व शर्तींवर मरिना प्रकल्पास देण्यात आला आहे. सदर प्रकल्पास लागणारी सीआरझेडची परवानगीही मिळाली असून सदर प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर काम हे मे. स्वस्तिक इन्फ्रा लॉजिक प्रा. लि. या कंपनीस देण्यात आले असून कंपनीने प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे सादर केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३० प्रवासी बोटींसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार असून वेटिंग रूम, पार्किंग, अँपी थिएटर, गार्डन, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. करमणूक व मनोरंजनकरता असणाऱ्या मोठ्या बोटीचीही सुविधा मरिना प्रकल्पामध्ये करता येणार असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामांकरता अंदाजे १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने लवकरच हा प्रकल्प उदयास येणार असल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

नियोजित मरिना प्रकल्पाच्या बाजूलाच ८ कोटी रुपये खर्चाने बेलापूर जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. या जेट्टीच्या माध्यमातून भाऊचा धक्का, मांडवा, एलिफंटा, करंजा अशा प्रवासी बोटींच्या फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचा –

Covid second wave: कोरोनामुळे बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू; महाराष्ट्रात १४ डॉक्टर मृत्यूमुखी

बेलापूर मरिना प्रकल्पास लवकरच सुरुवात
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -