घरनवी मुंबईकोरोनामुक्तीनंतरही म्युकरमायकोसिसबाबत काळजी आवश्यक

कोरोनामुक्तीनंतरही म्युकरमायकोसिसबाबत काळजी आवश्यक

Subscribe

कोविडमधून बरे झाल्यानंतर अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार असलेल्या तसेच ज्यांना कोविड उपचारादरम्यान स्टिरॉईड दिलेले आहे.

कोविडमधून बरे झाल्यानंतर अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार असलेल्या तसेच ज्यांना कोविड उपचारादरम्यान स्टिरॉईड दिलेले आहे. अशा व्यक्तींनी म्युकरमायकोसिसबाबत जागरूक रहावे व लक्षणे जाणवल्यास त्वरीत जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील म्युकरमायकोसिस ओपीडीमध्ये जाऊन विनामूल्य तपासणी करून घ्यावी. तसेच म्युकरमायकोसिसवरील काहीसे महागडे असलेले उपचार महानगरपालिकेच्या वतीने मोफत केले जात आहेत. त्यामुळे लक्षणे लपवू नयेत याविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती करावी, अशी सूचना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स सदस्यांनी केली.

महानगरपालिका क्षेत्रातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णस्थितीचा आढावा आणि उपचारपद्धती याविषयी विचार विनीमय करणेबाबत आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोविड टास्क फोर्सशी वेबसंवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच वेबसंवादाद्वारे नवी मुंबई महानगरपालिका कोविड टास्क फोर्सचे सदस्य नायर हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉजिस्ट डॉ. उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. समीर बोभे आदी तज्ज्ञ डॉक्टर्स सहभगी झाले होते.

- Advertisement -

कोरोनामधून बरे झाल्यानंतर ७ ते ८ आठवडे म्युकरमायकोसिसबाबत काळजी घेण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरमार्फत १ एप्रिलपासून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या ९ हजाराहून अधिक कोरोनामुक्त व्यक्तींना दूरध्वनीद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली आहे. त्यामधील म्युकरमायकोसिसची जोखीम असलेल्या ९५० हून अधिक मधुमेही रुग्णांना दररोज फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात येत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली. त्यावर गृह विलगीकरणात राहुन कोरोनामुक्त झालेल्या मधुमेही व किडनीचे विकार असलेल्या रुग्णांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत कोरोनाच्या लक्षणांबाबत तसेच महानगरपालिकेमार्फत तपासणी आणि उपचार मोफत आहेत. याची माहिती पोहोचवावी, अशी सूचना टास्क फोर्समार्फत करण्यात आली.

म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल माध्यमांप्रमाणेच शहरात ठिकठिकाणी मोठी होर्डींगही लावण्यात आलेली आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे जनतेमध्ये म्युकरमायकोसिसची माहिती व त्याबाबत घ्यावयाची काळजी याची माहिती प्रसारित करण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

- Advertisement -

यामध्ये खासगी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे अधोरेखीत करीत नागरिक आपल्या प्रकृतीबाबत सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या खासगी डॉक्टरांशी संपर्क साधतात. त्यामुळे म्युकरमायकोसिसबाबत खासगी डॉक्टर्समध्ये जागरूकता व सतर्कता आणण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे टास्क फोर्स मार्फत सूचित करण्यात आले. याबाबत त्वरीत निर्णय घेत आयुक्तांनी खासगी डॉक्टरांची वेबिनारद्वारे कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. रुग्णालयीन उपचारादरम्यान स्टिरॉईडच्या प्रमाणित वापराबाबतही डॉक्टरांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज टास्क फोर्सने व्यक्त केली. कोविडबाधीत रुग्ण उपचार घेत असतानाच त्याचा मधुमेह नियंत्रणात आहे काय याबाबतची नियमित तपासणी करण्यात यावी व असे रुग्ण डिस्चार्ज होताना त्यांना पुढील ६ ते ८ आठवडे काळजी घेणेबाबत म्युकरमायकोसिसच्या लक्षणांची माहिती देणारे पत्रक द्यावे व काही लक्षणे जाणवल्यास महानगरपालिकेशी त्वरीत संपर्क साधण्यास सांगावे, असेही सूचित करण्यात आले.

हेही वाचा –

जमिनीची राखीव किंमत गोठविण्याचा सिडकोचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -