कॅशलेस तिकीट वितरीत केल्याबद्दल वाहकांचा सत्कार;  व्यवस्थापकांच्या हस्ते गुणगौरव 

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एनएमएमटी बस ट्रॅकर अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने परिवहन उपक्रमाच्या प्रवाशांकडून जास्तीत जास्त फोन-पे पद्वारे ऑनलाईन पद्धतीने कॅशलेस तिकीट विक्रीची रक्कम स्विकारुन सदरची रक्कम जमा करणार्‍या वाहकांचा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मुख्यालय, सिबी

नवी मुंबई:  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एनएमएमटी बस ट्रॅकर अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने परिवहन उपक्रमाच्या प्रवाशांकडून जास्तीत जास्त फोन-पे पद्वारे ऑनलाईन पद्धतीने कॅशलेस तिकीट विक्रीची रक्कम स्विकारुन सदरची रक्कम जमा करणार्‍या वाहकांचा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मुख्यालय, सिबीडी-बेलापूर येथे आज १६ फेब्रुवारी रोजी परिवहन व्यवस्थापकांच्या हस्ते गुणगौरव व सत्कार करण्यात आला.
कॅशलेस पेमेंट पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करावा असे अवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत प्रवाशांना करण्यात येत आहे.
परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांच्याहस्ते पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला. एनएमएमटीच्या ऑनलाईन प्रणालीची अधिकाधिक सुविधा देणार्‍या २४ वाहकांचा सत्कार करण्यात आला. सेवा देणार्‍या मुख्य लेखा वित्त अधिकारी तुषार दौंडकर, मुख्य वाहतुक अधिकारी अनिल शिंदे, आयटीएमएस विभाग प्रमुख सुनिल साळुखें, आगार व्यवस्थापक आसूड गाव व घणसोली उमाकांत जंगले, आगार व्यवस्थापक तुर्भे विभाग सुनील जगताप, कर्मचारी व प्रशासन अधिकारी दिपिका पाटील, सहाय्यक वाहतुक अधीक्षक धर्मराज भगत व निवृत्ती सिताप, फोन पे अ‍ॅपचे अक्षय उपस्थित होते.

एनएमएमटीच्या माध्यमातून नागरिकांना वातानुकुलित सेवा देण्यात येत आहे. त्या सेवेबरोबरच इंधन मुक्त इलेक्ट्रीक पर्यावरण पुरक बसेसचा उपक्रम सुरु केला आहे. दर्जेदार सुविधां देताना प्रवाशांसाठी आधुनिक तिकीट सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिवहनच्या उपक्रमात सहकार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचे यापुढे देखील कौतुक करण्यात येईल.
– योगेश कडूसकर, परिवहन व्यवस्थापक