नवी मुंबईत हजारो विद्यार्थी, युवकांकडून स्वच्छतेचा जागर

city always leads in cleanliness

हजारो विद्यार्थी, युवकांकडून स्वच्छतेचा जागर
नवी मुंबई:
इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत ४१ हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांनी विशेष कार्यक्रमात सहभागी होत स्वच्छतेचा एकमुखाने जागर केला. त्याचप्रमाणवाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमधील सभागृहात लावलेल्या बीग एलईडी स्क्रीनवरुन ऑनलाईन अनुभवणार्‍या १२ हजार विद्यार्थी आणि युवकांनीही या स्वच्छता जागरात सहभाग घेतला.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये युथ वर्सेस गार्बेज या टॅगलाईन नुसार भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये ५३ हजारहून अधिक युवकांनी स्वच्छ नवी मुंबईचा जागर केला. याप्रसंगी नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार पद्मश्री शंकर महादेवन,आमदार गणेश नाईकआमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सह सुप्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणार्‍या नवी मुंबईतील तरूणाई समोर आज स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी यायला मिळते आहे याचा आनंद वाटतो. युवा शक्तीमुळे स्वच्छता कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास वाटतो.
– मकरंद अनासपुरे
अभिनेते

स्वच्छतेत शहर नेहमीच आघाडीवर
नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे स्वच्छतेमध्ये आपण नेहमीच आघाडीवर असतो आणि यापुढील काळातही राहू अशी खात्री आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. तर आमदार रमेश पाटील यांनी आपल्या नवी मुंबई शहराने विविध सेवासुविधांमध्ये पुढाकार घेतला असून स्वच्छतेतही आपला पहिला नंबर असाच कायम राहील असे आजच्या उपस्थितीमधून दिसून येत असल्याचे सांगितले.