घरनवी मुंबईकोरोनामुक्त मधुमेही व्यक्तींना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक

कोरोनामुक्त मधुमेही व्यक्तींना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक

Subscribe

कोविड १९ ची तीव्रता मागील काही आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे. तसेच प्रतिदिन केल्या जाणाऱ्या कोविड चाचण्यांच्या तुलनेत चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही २ ते ३ टक्के इतके कमी झाल्याचे काहीसा दिलासा देणारे चित्र दिसत आहे.

कोविड १९ ची तीव्रता मागील काही आठवड्यांपासून कमी होताना दिसत आहे. तसेच प्रतिदिन केल्या जाणाऱ्या कोविड चाचण्यांच्या तुलनेत चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही २ ते ३ टक्के इतके कमी झाल्याचे काहीसा दिलासा देणारे चित्र दिसत आहे. असे असले तरी कोरोना अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवणे गरजेचे असून त्यादृष्टीने मास्क, सुरक्षित अंतर आणि हात कायम स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा दैनंदिन जीवनात वापर अनिवार्य आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काहीशी ओसरत असल्याचे दिसत असतानाच मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या रूपाने एक नवीनच संकट आपल्यापुढे उभे राहिलेले आहे. या संकटावर मात करण्यासाठी नवी मुंबई महापालिका दक्ष असून म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिपद्वारे नागरिकांशी संवाद साधत ‘घाबरू नका पण दक्षता घ्या, असे आवाहन करत ‘महानगरपालिका आपल्या सोबत आहे’, असा विश्वास दिला आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसशी संबंधित चर्चा सुरू झाल्याबरोबर त्याच दिवशी आयुक्तांनी तातडीने नवी मुंबई सिटी टास्क फोर्स आणि म्युकरमायकोसिसशी संबंधित उपचार करणाऱ्या नवी मुंबईमधील रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवादाद्वारे सविस्तर चर्चा करत महानगरपालिकेचा म्युकरमायकोसिस संबंधित कृती आराखडा तयार केला आणि त्वरित अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली.

या कार्यवाहीच्या समन्वयासाठी या क्षेत्रातील अनुभवी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरता बाह्यरुग्ण सुविधा (ओपीडी) कक्ष कार्यान्वित करण्यात आले. याठिकाणी गरज भासल्यास डायग्नोस्टिक टेस्ट्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात म्युकरमायकोसिस वरील रूग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

- Advertisement -

त्यातूनही एखाद्या रूग्णाला शस्त्रक्रियेची गरज भासली तर ही शस्त्रक्रिया गुंतागुतीची असल्याने शहरातील नामांकीत सर्जनचे एक पॅनल बनविण्यात आले असून आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. म्युकरमायकोसिस बाबत तिन्ही महापालिका रूग्णालयाच्या ओपीडीमधील तपासणी, टेस्ट्स तसेच वाशी रूग्णालयातील उपचार विनामूल्य केले जातील, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी जनसंवादामध्ये आश्वस्त केले. नागरिकांच्या मनात म्युकरमायकोसिसचे औषध उपलब्धतेबाबात तसेच ते महाग असल्याने खर्चाबाबत चिंता असून पालिका शहरातील रूग्णांना प्राधान्याने औषध कसे उपलब्ध होईल, याबाबत महापालिका दक्ष असून ज्यांना परवडत नाही, त्यांना औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. लक्षणे दिसू लागल्यानंतर जर रूग्णाने लगेच तपासणी केली नाही व त्यामुळे उपचारास काहीसा विलंब झाला तर हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे लवकर उपचार सुरू होणे हे अतिशय महत्वाचे आहे. हे लक्षात घेत कोरोनोवरील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या व ज्यांना कोमॉर्बिडिटी विशेषत्वाने डायबेटिस आहे, अशा व्यक्तींवर विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरद्वारे संपर्कास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

हेही वाचा –

Mucormycosis: म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मदतीसाठी शाळकरी मुलं आली धावून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -