घरनवी मुंबईनवी मुंबई महापालिका कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार

नवी मुंबई महापालिका कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार

Subscribe

नोकरीसाठी दीड ते तीन लाख रुपये उकळले

नवी मुंबई महापालिकापालिकेतील कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अनेक तरुणांकडून नोकरीसाठी दीड ते तीन लाख रुपये उखळले गेले आहे. यामध्ये तथाकथित लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे काही पदाधिकारी असल्याचा आरोप आहे. दरम्यान, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी तक्रार करून सदर कामगार भरतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतल्याने मधले दलाल आणि म्होरक्यांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, उद्यान, घनकचरा व्यवस्थापन, वाहन अशा विविध विभागात मनुष्यबळ पुरवठा केला जातो. कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ पुरविणारे ठराविक कंत्राटदार असल्याने लोकप्रतिनिधी व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे कंत्राटदारामार्फत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून दीड ते तीन लाख रुपयांची मागणी करून अनेक तरुणांना नोकरीला लावल्याचीमाहिती उघड झाल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. कंत्राटी पद्धतीने मिळाले काम हे तात्पुरते असून ती नोकरी कधीही गमवावी लागेल, याची भनक देखील या तरुणांना नाही. मात्र, कंत्राटी नोकरी टोकवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळले गेल्याचे उघड झाले आहे. कंत्राटी कामगारांच्या भरतीत पालिकेचे नियंत्रण नसल्याने सदर प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सद प्रकार अत्यंत गंभीर असून पालिका आयुक्तांनी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे.

नवी मुंबई महापालिका कामगार भरतीत लाखोंचा भ्रष्टाचार
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -