घरनवी मुंबई'योगायोग असू शकत नाही'; औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

‘योगायोग असू शकत नाही’; औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ओरंगजेबाचे उदात्तीकरण होत आहे. या सर्व प्रकराबातत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाचे लोक वारंवार दंगली घडव्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहेत आणि त्यानंतर अशाप्रकारे विशिष्ट समाजाकडून औरंदजेबाचे उदात्तीकरण होणे हे योगायोग असू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे. (‘Couldn’t be a coincidence’; Deputy CM targets opponents over Aurangzeb’s exaltation)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख नेते वारंवार म्हणतात याठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर काही तरुण औरंगजेब आणि टीपू सुलतान यांचं उदात्तीकरण करतात. त्यामुळे या विधानांचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण यांना फुस लावत आहे. कोण या लोकांना अशाप्रकारचे उदात्तीकरण करण्यास सांगत आहे. याची देखील चौकशी आम्ही करतो आहोत. काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजत आहे, पण सगळी चौकशी त्यासंदर्भात झाल्यानंतर काही गोष्टी मी सांगेन. पण मी निश्चितपणे सांगतो, अचानकपणे अशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टीपू सुलतान यांचं उदात्तीकरण सुरू होणं हे सहज होत नाही आहे आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं दंगली घडव्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर अशाप्रकारे विशिष्ट समाजाकडून औरंदजेबाचे उदात्तीकरण होणे हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जावेच लागेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

- Advertisement -

औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला हे स्पष्टपणे दिसत आहे की, विरोधी पक्षातले सर्व एका भाषेत बोलत आहेत. एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देऊन औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते. परंतु आम्ही औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. विरोधी पक्षातले काही नेते औरंजेबाला देशभक्त ठरवायला निघाले आहेत आणि औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. सर्व एकाचवेळी एका सुरात बोलल्यानंतर त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची चौकशी करायलाच पाहिजे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे
शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला, तर त्यावरून पुण्यात आंदोलन करायची काय गरज? पुण्यात कोणाला याविषयी पडले आहे का? मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -