Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईCrime : लाखाचे 5 लाख करताना दीड लाखाची फसवणूक, मोबाईलवरील जाहिरातीला भुलल्याचा...

Crime : लाखाचे 5 लाख करताना दीड लाखाची फसवणूक, मोबाईलवरील जाहिरातीला भुलल्याचा फटका

Subscribe

पनवेल : पैशांच्या लोभामुळे मोबाईलवरील जाहिरातीला भुललेल्या युवकाला पाच लाख रुपये मिळाले नाहीतच मात्र, खिशातले दीड लाख रुपये गमवावे लागले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवन सरोजकर हा वाहनचालक म्हणून काम करतो आणि उल्हासनगरला राहतो. त्याला 24 नोव्हेंबर रोजी मोबाईलवर ‘एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देतो’ अशी जाहिरात दिसली होती. त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

मोबाईलवरील लाखाच्या बदल्यात पाच लाखाची जाहिरात पाहून पवन सरोजकर याला लोभ झाला. त्याने तो व्हिडीओ पाहिला आणि व्हिडिओमधील मोबाईलवर फोन केला. तेव्हा समोरील व्यक्तीने त्याचे नाव विशाल असल्याचे सांगितले. यावेळी पवन दीड लाख गुंतवणूक करण्यास तयार झाला. त्याने पैसे कुठे द्यायचे हे विशालला विचारले तेव्हा विशालने दुसरा मोबाईल क्रमांक देऊन फोन करण्यास सांगितले. त्या फोनवर फोन केल्यावर समोरील व्यक्तीने त्याचे नाव माणिक शह असल्याचे सांगितले. तसेच पवनला दीड लाख रुपये घेऊन पनवेल बस स्टॉपवर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे पवन आणि त्याची पत्नी काजल दीड लाख रुपये घेऊन 25 नोव्हेंबर रोजी पनवेल बस स्टॉपवर आले.

- Advertisement -

हेही वाचा…  Dacoity : दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक; तिघे पसार तर आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त

त्यानंतर माणिक शहाने पवनला ओरियन मॉलजवळ येणास सांगितले. पत्नीला बस स्टॉपजवळ थांबवून पवन ओरियन मॉल येथे गेला. यावेळी एका व्यक्तीने पवनची भेट घेतली आणि आपल्याला माणिक शहा यांनी पाठवल्याचे सांगून ओरियन मॉलच्या मागच्या बाजूस घेऊन गेला. त्यावेळी एकजण पांढऱ्या रंगाची दुचाकी घेऊन आला. त्यात एक बॅग होती ती बॅग उघडून दाखवली. त्यातील बंडल काढून पाचशेची एक नोट पवनच्या हातात दिली. ती नोट खरी असल्याने पवनने त्याच्याकडील दीड लाख रुपये त्याच्याकडे दिले. त्यानंतर त्याने बॅगेतील पैशांचे बंडल काढून पवनच्या पिशवीत टाकले. काही वेळाने ते दोघेही मोटरसायकलवर बसून निघून गेले.

- Advertisement -

पवनने त्याच्या पिशवीतील बंडल तपासले तेव्हा प्रत्येक बंडलला वर खाली खरी नोट आणि आतील सर्व नोटा नकली असल्याचे दिसले. त्यानंतर पवनने लगेचच माणिक शहाला फोन करून विचारणा केली तेव्हा त्याने ठाणे येथे येण्यास सांगून पैसे परत करतो, असे सांगितले. पवन ठाण्याला गेल्यावर माणिकने उद्या पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवन याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -