घरनवी मुंबईनिदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो - राज्यपाल रमेश बैस 

निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो – राज्यपाल रमेश बैस 

Subscribe

  मुलांच्या वेदनांपेक्षा जास्त वेदना पालकांना सहन कराव्या लागतात. ही स्थिती असलेल्या मुलांची काळजी घेणारी केंद्रे देशात फार कमी आहेत. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो असे प्रतिपादन मा. राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

पनवेल:  मुलांच्या वेदनांपेक्षा जास्त वेदना पालकांना सहन कराव्या लागतात. ही स्थिती असलेल्या मुलांची काळजी घेणारी केंद्रे देशात फार कमी आहेत. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो असे प्रतिपादन मा. राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्किल्सचा पाचवा वर्धापन दिन सोहळा बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ.प्रवीण शिनगारे, कोंकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना गिफ्ट ऑफ लॉईफ प्रमाणपत्र मा. राज्यपालांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन यांची समोयोचित भाषणे झाली.

जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत, असे केल्याने आम्ही मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरीत्या कमी करू आणि वेळेवर हस्तक्षेप करण्यास सक्षम होऊ, ज्यामुळे मौल्यवान जीव वाचू शकू.
– रमेश बैस,
राज्यपाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -