घरनवी मुंबईरिलायन्स आंदोलनकर्त्याचा मृत्यू

रिलायन्स आंदोलनकर्त्याचा मृत्यू

Subscribe

येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून हा शासकीय आणि रिलायन्स प्रशासनाच्या अनास्थेचा बळी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सारिका वारगुडे यांचा पुत्र जगदिश किसन वारगुडे (२९) हा २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनात सहभागी झाला होता. रविवारी रात्री तो आंदोलनाच्या ठिकाणी मोबाईलवर गाणीही ऐकत असल्याचे लोकशासन संघर्ष समितीचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी सांगितले.

- Advertisement -

सोमवारी जगदिश याला चक्कर आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. मृतदेह विच्छेदानासाठी रोहे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू असल्याने अनेकांचे पाय सुजले असल्याचे मिणमिणे यांनी सांगितले. तसेच मुलाच्या नोकरीसाठी आंदोलनात सहभागी असलेल्या ७० वर्षीय उमाजी सखाराम घासे (रा. बेणसे) यांना सोेमवारी सायंकाळी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -