घरनवी मुंबईविविध प्रकल्पांसह कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विविध प्रकल्पांसह कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

ठाणे जिल्हाचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी ऐरोली विभागामध्ये नागरी कामाचे लोकार्पण करण्यात आले.

ठाणे जिल्हाचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी ऐरोली विभागामध्ये नागरी कामाचे लोकार्पण करण्यात आले. ऐरोली येथील चिचंपाडा या झोपडपट्टीत विभागात माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यामातून झोपडपट्टी विभागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यामातून कोविड सेंटर उभे करण्यात आले. या सेंटरची क्षमता एकूण १०० बेडची असून त्यापैकी सुमारे १७ बेडवर आयसीयू व व्हेंटिलेटरची आणि अन्य सर्वच बेडवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांसाठी विशेष आयसीयू वॉर्डही या रुग्णालयात तयार करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यामातून ऐरोली आणि दिघा परिसरातील झोपडपट्टीवासियांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धरतीवर वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. त्याचप्रमाणे पालिकेने ऐरोलीतील चिंचपाडा येथे ५ टन क्षमतेचा सेंद्रिय घनकचरा, सांडपाणी आणि टाकाऊ वस्तूच्या माध्यमातून बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. त्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर आदी उपस्थित होते.

घनकचरा आणि सांडपाण्याच्या माध्यमातून बायोगॅस आणि वीज निर्मिती करणारा हा राज्यातील प्रकल्प आहे. या प्रकल्पांमधून जवळपास प्रतिदिन ३०० युनिट्स वीजनिर्मिती होणार असून ३०० युनिट्स वीजनिर्मिती मधून चिंचपाडा विभागातील रस्त्यालगत असणारे ३०० पथदिवे पेटणार आहे. त्याचप्रमाणे बायोगॅसमधून स्वयपाकासाठी घरगुती इंधनाचा देखील वापर करण्यात येणार आहे. बॉयोगॅस युनिट उभारण्यासाठी पालिकेने एक कोटी ६१ लाख ५७ हजार १४० रुपये खर्च कलेला आहे. तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी खासदार राजन विचारे यांनी ७० लाखांचा निधी त्याचप्रमाणे पालिकेने ४५.८२ लाख रुपये व माइन्ड स्पेस बिझनेस प्रा. लि यांनी सीएसआर फांडातून ६२.५० लाख रुपये खर्च कररुन प्रकल्प उभा केला आहे.

- Advertisement -

पालकांचे छत्र हरपलेल्यांना मदत

कोरोनाच्या कालावधीत तत्परतेने सेवा बजावणाऱ्या डॉक्टर नर्स आणि इतर सेविकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे मृत आई वडिलांचे छत्र हरपलेल्या कदम त्यांच्या मुलाला आर्थिक मदत देण्यात आली. तर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

- Advertisement -

हेही वाचा –

अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार? राऊत म्हणतात कॅमेरे तयार ठेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -