घरनवी मुंबईदिघ्यातील रहिवाशांची पाण्याची चिंता मिटणार

दिघ्यातील रहिवाशांची पाण्याची चिंता मिटणार

Subscribe

मोरबे धरणाचे पाणी मे अखेरपर्यत मिळणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणातील पाणी दिघ्यापर्यंत पोचविण्याच्या कामाला आता गती आलेली आहे. तर दिघ्यातील जागेचा अडथळा निर्माण झाल्यामुळे 700 मीटर पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण जामिनी मालकांनी जागा देण्याची सहमती दर्शवल्यांनतर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले आहे. मे अखेर पर्यत काम पूर्ण होणार असल्याने ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईतून मुक्तता मिळेल.

2016 मध्ये दृष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यांनतर दिघ्यातील रहिवाशांना पाणी कपातीमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन 2017 पासून मोरबे ची जलवाहिनी दिघ्यापर्यत पोहचवण्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च करुन काम करण्यात येत होते. पण दिघा येथील गवतेवाडी येथील जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण झाली होती. पण पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अंभियता संजय देसाई यांनी मोरबे ची जलवाहिनी दिघापर्यत पोहचवण्याचे काम मार्गी लावले. यासाठी जमिन मालकांनी देखील जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिल्यामुळे येथील जलवाहिनी टाकण्याचा प्रश्न मिटला आहे.

- Advertisement -

सद्याास्थितीमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून मे अखेरपर्यंत काम मार्गी लागणार आहे.
खालापूरनजीक धावरी नदीवर मोरबे धरण उभारण्यात आले आहे. या धरणामुळे नवी मुंबई जलसंपन्न आहे. प्रतिदिन 450 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवी मुंबई पालिकेच्या मालकीचा हा जलस्रोत आहे. भोकरपाडा येथे 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नवी मुंबईकरांना या धरणातून मुबलक पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत मोरबे धरणातून दिवसाला अंदाजे 430 एमएलडी पाणी उचलले जाते. तर याच धरणातून उचललेल्या पाण्यावर भोकरपाडा येथे प्रक्रिया केली जाते.

धरणातील पाच एमएलडी पाणी नजीकच्या गावांना दिले जाते. त्यानंतर सिडकोने वसवलेल्या कामोठे नोडसाठी 35 एमएलडी पाणी दिले जाते. त्यानंतर खारघर नोडसाठी पाच एमएलडी पाणी दिले जाते. उर्वरित पाणी नवी मुंबई शहराला पुरवले जाते. पण नवी मुंबईतील ऐरोली, दिघा आणि रबाळे परिसरात मोरबे धरणातील पाणी पोचलेले नाही. त्याऐवजी येथील नागरिकांना एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यासाठी पालिका 55 एमएलडी पाणी एमआयडीसीकडून विकत घेते. तर बारावी कडून येणाऱ्या पाण्याची देखील ऐरोली दिघ्या मध्ये कमतरता जाणवते. म्हणून लोकप्रतिनिधीनि वारंवर सर्वसाधरन सभा, स्थायी समिती च्या सभेत ऐरोली दिघ्या ला मोरबे चे पाणी मिळावे यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने मोरबे चे जलवाहिनी दिघापर्यत पोहचवण्याचा निर्णय घेतला होता. पण गवतेवाडी येथील जागेमुळे काम रखडले होते. पण आता काम मार्गी लागणार असून दिघा ऐरोली व रबाले येथील नगारिकांना मोरबेचे पाणी मिळणार आहे.

- Advertisement -

नवी मुंबई पालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील पाणी दिघ्यापर्यंत पोहचवण्याचे काम सुरु होते. पण दिघा येथे 700 मीटरची जलवाहिनी टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व जागा मालकांच्या सहमतीमुळे मोरबे धरणाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लागले असून मे अखेर पर्यत जलवाहीणी टाकण्याचे काम पुर्ण होईल.
– संजय देसाई, कार्यकारी अभियंता नमुंमपा

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -