घरनवी मुंबईरामशेठ ठाकूर यांच्यावतीने गरजू पालक, पत्रकारांना अन्नधान्य किटचे वाटप

रामशेठ ठाकूर यांच्यावतीने गरजू पालक, पत्रकारांना अन्नधान्य किटचे वाटप

Subscribe

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीने कोरोनाच्या या संकटकाळात पालकांच्या आणि स्कूल बसेसच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहून त्यांना अशा या अडचणीच्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देऊन मोलाचे कार्य केले आहे.

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीने कोरोनाच्या या संकटकाळात पालकांच्या आणि स्कूल बसेसच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहून त्यांना अशा या अडचणीच्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देऊन मोलाचे कार्य केले आहे, असे उद्गार महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी नुकतेच येथे काढले. ते बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्यावतीने मोफत अन्नधान्य वाटप प्रसंगी बोलत होते.

रामशेठ ठाकूर यांचा २ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर ग्रामविकास मंडळ आणि पनवेल भाजपतर्फे पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रातील गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असणाऱ्या मुंबईतील बालमोहन विद्यामंदीर शाळेच्या पालकांना, स्कूल बसेसच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची किट देऊन सहकार्य करावे, अशी बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष तसेच पत्रकार राजेंद्र साळसकर यांनी रामशेठ ठाकूर यांच्याकडे केली. साळसकर यांच्या विनंतीला मान देऊन आवश्यक त्या जीवनावश्यक सामग्रीच्या किट त्यांनी साळसकर यांना सुपूर्द केल्या.

- Advertisement -

या जीवनावश्यक किट लालबाग येथील एका समारंभाद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते बालमोहन शाळेच्या पालकांना, स्कूल बसेसच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, युवा उद्योजक उदय पवार व आशिष भालेराव, बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र साळसकर, कार्याध्यक्ष दिपक घाडीगावकर, समाजसेवक नितीन कोलगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित भालेराव, उदयराज धुरी, दिपा राणे, वैभव सावंत आणि अभिषेक कुळे आदींनी विशेष सहकार्य केले. कोरोनाच्या या संकटकाळात अडचणीच्या वेळी उपयुक्त मदत केल्याबद्दल सर्व लाभार्थी पालक, स्कूल बसेसचे कर्मचारी आणि पत्रकारांनी थोर दानवीर तसेच रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले तसेच ठाकूर यांचे आभार मानले. त्याचबरोबर ठाकूर यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर यांना दिर्घायुष्य चिंतिले.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -