घरनवी मुंबईडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाने अनुयायी भारावले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाने अनुयायी भारावले

Subscribe

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी ऐरोली येथील स्मारकांमध्ये दाखल झाले होते.

ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांच्या दुसर्‍या टप्पयातील अंतर्गत सजावटीच्या सह विविध वास्तुचे लोर्कापण रविवारी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल्यांनतर सोमवारी, ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी ऐरोली येथील स्मारकांमध्ये दाखल झाले होते. यावेळी मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वारण दिनाच्या दिवशी दादर येथील चैत्यभुमीवर अनुयायांची गर्दी होते. मात्र मागील दोन वर्षात कोरोनाच्या कालावधीत चौत्यभुमीवर दर्शन बंद करण्यात आले होते. तर यंदा ओमायक्रॉनच्या सावटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दर्शन बंद ठेवण्यात आले. मात्र नवी मुंबईकरांना ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाऊन त्यांना अभिवादन करता आले. त्यामुळे अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर स्माकरांची असणारी भव्यता बघून अनुयायी भारावले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वारण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमी येथे जावे लागत होते. कोरोनामुळे तिथे अभिवादन करण्यासाठी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ऐरोली येथील स्माकरांमध्ये अभिवादन करण्यासाठी आलो आहे. स्माकरांमधील विद्युत रोषणाई व भव्यता पाहून भारावून गेलो आहे. येथील प्रशस्त हॉल, ग्रंथालय, मेडिटेशन सेंटर बघून आंनद झाला.
– सागर कांबळे, नागरिक

- Advertisement -

ऐरोली सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक २२ (ए) येथे ५७५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक साकारले आहे. या स्मारकांमध्ये शेकडो अनुयायी सहकुटुंब डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी प्रशासनाकडून तिथे चहा-नाष्ट्याची देखील व्यवस्था करण्यात आली होते. आंबेडकरी अनुयायींबरोरबच राजकीय नेते, प्रशासकीय आधिकारी यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्मारकांमध्ये ओमायक्रॉनच्या सावाटामुळे मास्क लावणार्‍यांनाचा प्रवेश देण्यात येत होता. स्मारकांमध्ये आल्यांनतर प्रवेशद्वारला वरील भव्यता बघितल्यांनतर आता प्रवेश केल्यांनतर प्रशस्त रंगमंच बघण्यात आल्यांनतर स्माकरांमधील मागच्या बाजुला असणार्‍या ग्रंथालय तसेच ई-लायब्ररी बघण्यात आल्यांनतर अत्याधुनिक ऑडियो सुविधेसह जीवनप्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन वेगळाच अनुभव देणारे ठरले. तर पहिल्या मजल्यावर डोमच्या खाली असणारे ध्यानगृह पाहून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांमधील गंथालयाच्या बाहेर अभिप्राय नोंदवण्यासाठी बुक ठेवण्यात आले होते. या ठिकाणी स्मारकाला भेट दिल्यांनतर अनुयायांची अभिप्राय नोंदवण्यासाठी गर्दी करण्यात येत होती.

सेल्फी काढताना मोह आवरेना

मागील दहा वर्षांपासून प्रतिक्षेत असणार्‍या स्मारकांचे काम पूर्ण झाल्यांनतर तेथील भव्यता बघून स्माकरकांमध्ये आल्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांयाना छायाचित्र काढण्याचा मोह आवरता येत नव्हता. या ठिकाणी असणार्‍या छायचित्र दालनामध्ये फोटो काढण्यात येत होते. तर स्मारकांमध्ये आल्यांनतर तेथील भव्यता तसेच विद्युत रोषणाई पाहून सेल्फी काढण्यात येत होते.

- Advertisement -

 हेही वाचा –

मुंबई एअरपोर्टवर Rapid RTPCR चाचणीसाठी खाजगी ऑपरेटरकडून प्रवाशांची लूट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -