वाशीसह ऐरोलीत टोल माफी करा; आमदार मंदा म्हात्रेंची मागणी

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

प्रातिनिधीक फोटो

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.याबाबत सातत्याने आमदार म्हात्रे पाठपुरावा करत आहेत. मुख्य म्हणजे या मागणीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनीही सकारात्मक चर्चा करून याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. ही बाब नवी मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे.

नवी मुंबई हे वाढते शहर आहे. विकासकामांप्रमाणे लोकसंख्याही वाढली आहे. तसेच घरटी चारचाकी वाहनांचे प्रमाणदेखील वाढत आहे. या शहरात राहणारे लाखो नागरिक हे मुंबईतून स्थायिक झालेले असल्याने सातत्याने नोकरी व व्यवसायानिमित्त ते सातत्याने मुंबईत जातात. मात्र त्यांना वाशी व ऐरोली दरम्यान टोल भरावा लागतो. त्यामुळे नवी मुंबईकरांची टोलमधून सुटका व्हावी, यासाठी पुन्हा मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली असून त्याबाबत नवीन वर्षात नवी मुंबईकरांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

नवी मुंबई शहर हे मुंबईला लागून आहे. नवी मुंबईतील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करतात. नवी मुंबई पासिंग असलेल्या एमएच ४३ वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ करावा, याकरता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे गेली ६ वर्षे मागणी करत आहेत. २०१८ च्या हिवाळी अधिवेशनातही आमदार म्हात्रे यांनी औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात हा विषय मांडला होता. मात्र अजूनही याबाबत कार्यवाही न झाल्याने नवी मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा टोल नाका तयार झाल्यापासून नवी मुंबईतील नागरिक टोल भरणा करत आहेत. या टोल वसुलीचा कार्यकाळ संपून कालावधी लोटला आहे. तसेच रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्चही वसूल झाला असताना टोल वसुली सुरूच आहे. ही नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक ठरत आहे.

हेही वाचा –

Covid Self Test Kit : आता विक्रेत्यांना कोविड सेल्फ टेस्टिंग किटबाबत पालिकेला माहिती द्यावी