घरनवी मुंबईवाहतूक कोंडी फोडण्यासाठी पामबीच मार्गाचे विस्तारीकरण

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पामबीच मार्गाचे विस्तारीकरण

Subscribe

सिडकोच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण करणार असून या प्रकल्पाकरिता आर्थिक योगदान देण्याचा निर्णयही सिडको महामंडळाने घेतला आहे.

सिडकोच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण करणार असून या प्रकल्पाकरिता आर्थिक योगदान देण्याचा निर्णयही सिडको महामंडळाने घेतला आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाकरता सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात खर्चाचा भार उचलण्यात येणार असून सिडकोतर्फे सदर कामाकरिता कमाल १२५ कोटींचा खर्च उचलण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे.

सिडकोतर्फे सीबीडी बेलापूर मार्गे ऐरोली ते मुलुंड-ठाणे-मुंबई यांना जोडणाऱ्या २१ .१२ कि.मी. लांबीच्या पाम बीच मार्गाचे नियोजन करण्यात आले होते. अनेक लहान मोठे पूल उभारण्यात येऊन सदर मार्ग २००४ मध्ये कार्यान्वित झाला. पाम बीच मार्गामुळे शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गांव्यतिरिक्त एक पर्यायी मार्ग सीबीडी बेलापूर ते ठाणे, मुंबई दरम्यानच्या वाहतुकीस उपलब्ध झाला. नियोजित पाम बीच मार्गापैकी १९ .२० किमी च्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून सीबीडी बेलापूर ते वाशी दरम्यान हा मार्ग पूर्णत: तर वाशी ते घणसोली दरम्यान अंशत: कार्यान्वित आहे. पूर्ण झालेला पाम बीच मार्ग नवी मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आला असून संबंधित महानगरपालिकेकडून त्याची देखभाल करण्यात येते. सद्यस्थितीत पाम बीच मार्गाच्या वाशी ते ऐरोली दरम्यान १.९४ किमीच्या टप्प्याचे काम अद्याप बाकी आहे. यामुळे पाम बीच मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना ऐरोली-मुलुंड पुलावर थेट प्रवेश उपलब्ध नाही.

- Advertisement -

पाम बीच मार्गाच्या घणसोली ते ऐरोली दरम्यान करण्यात येणाऱ्या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडीवर मात करण्यासह सीबीडी बेलापूर ते मुंबई व ठाणे दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होऊन प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोने प्रकल्प खर्चाचा भार अंशत: उचलून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको

पाम बीच मार्गाचे एरोली ते घणसोली दरम्यानचे प्रस्तावित विस्तारीकरण हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रादेशिक संधानतेचाही (रिजनल कनेक्टिव्हिटी) एक भाग आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या अद्ययावत व्यापक परिवहन अभ्यासानुसार सदर संधानता हा ठाणे ते सानपाडा या किनारी मार्गाचा भाग आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाच्या खर्चाचा काही भार सिडकोने उचलावा, अशी विनंती नवी मुंबई महानगरपालिकेकडून सिडकोला करण्यात आली होती. त्यानुसार, सिडकोने ५० :५० या प्रमाणात खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. सदर विस्तारीकरणाला २५० कोटी इतका खर्च अंदाजित असून सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येकी १२५ कोटी खर्चाचा भार उचलणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Weather Alert: मुंबई किनारपट्टीला ‘या’ दिवशी चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -