घरनवी मुंबईसिम्युलेटर घालवतोय शिकाऊ चालकांच्या मनातील भीती

सिम्युलेटर घालवतोय शिकाऊ चालकांच्या मनातील भीती

Subscribe

विना वाहनचालक परवाना वाहन चालवणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी चालक परवाना प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक परवाना काढणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी अनेकांची धडकी भरवणारी असते. त्यामुळे छोट्या-छोट्या चुका होऊनही चाचणीत नापास होण्याची वेळ अनेकांवर येते. त्यावर पर्याय म्हणून आरटीओ कार्यालयात सिम्युलेटर मशीन बसवण्यात आल्या आहेत. ज्या शिकाऊ चालकांची प्रत्यक्ष मैदानी चाचणी अपयशी ठरेल. त्यांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी या सिम्युलेटरचा आधार मिळत आहे. शासनाने वाहनचालक परवाना प्रक्रिया आधिक सोयीस्कर व सोपी केली आहे. विना वाहनचालक परवाना वाहन चालवणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी चालक परवाना प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक परवाना काढणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

चालक परवान्यासाठी आलेल्या व्यक्तींना गरज असल्यास सिम्युलेटरवर सराव करु दिला जातो. त्यात आत्मविश्वास वाढल्यास त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाते. यामुळे चाचणी फेल होण्याचा प्रसंग टळून त्यांचा वेळही वाचतो.
– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, नवी मुंबई

- Advertisement -

मात्र अनेकजण प्रत्यक्ष चाचणीवेळी आरटीओ अधिकाऱ्यांसमक्ष वाहन चालविताना गोधळतात. त्यातून छोटीशी चूक घडल्यास चाचणी फेल होते. त्यामुळे त्यांना पुन्हा चाचणी देण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. पंरतु त्यावर पर्याय म्हणून सिम्युलेटर मशीन वापरल्या जात आहेत. कारची चाचणी देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची चाचणी अपयशी झाल्यास किंवा त्याला मनोबलाची गरज असल्यास सिम्युलेटरवर त्याला सरावाची संधी दिली जाते. त्यामध्ये संगणकावर कार चालविण्याचा काहीसा सराव झाल्यांनतर प्रत्यक्षात त्यांना मैदानावर उतरविले जात आहे. मात्र यापूर्वी अशा व्यक्तींना अर्जावर फेलचा शिक्का पडताच काही महिन्यानंतर पुन्हा आरटीओ कार्यालयात खेटा मारव्या लागत होत्या.

आरटीओ प्रयत्नशील

नवी मुंबई आरटीओकडे दैनंदिन शेकडोच्या संख्येने वाहनचालक परवान्यासाठी अर्ज प्राप्त होत असतात. अनेकांना नोकरी व्यवसाय निमित्ताने चालक परवाना हवा असतो. यामुळे त्यांना वेळीच चालक परवाना न मिळाल्यास त्यांच्याकडून विनापरवानादेखील वाहन चालविले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांकडून निमयांचे उल्लघंन होणार नाही. यासाठीदेखील आरटीओ प्रयत्नशील असते.

- Advertisement -

हेही वाचा –

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -