घरनवी मुंबईनवी मुंबईतील पेपर कंपनीला आग; दोघे जवान जखमी, गॅस सिलेंडरचा स्फोट

नवी मुंबईतील पेपर कंपनीला आग; दोघे जवान जखमी, गॅस सिलेंडरचा स्फोट

Subscribe

नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील एमआयडीसी येथे एका पेपर कंपनीला शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत तर काम करणारी एक महिला या आगीत अडकल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते.

नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील एमआयडीसी येथे एका पेपर कंपनीला शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत तर काम करणारी एक महिला या आगीत अडकल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते. या आगीमुळे नवी मुंबईतील एमआयडीसी कंपन्यांच्या क्षेत्रात वाढत्या अतिक्रमणांचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढत्या अतिक्रमणांवर एमआयडीसी आणि पालिकेने कारवाई करून नागरी वसाहत असलेल्या या परिसरातून लघुउद्योगांना इत हलवण्याचे मागणी केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अग्निशामक दलाचे जवान गजेंद्र सुशविरकर आणि विवेक कलगुटकर हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून परत सोडण्यात आले तर या आगे त कंपनीमध्ये काम करणारी महिला कर्मचारी उर्मिला सखाराम नाईक या आग लागल्यापासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम अग्निशामक दलाचे जवान त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी करीत आहेत परंतु पुन्हा आगीने पेट घेतल्यामुळे अडचणींचा सामना निर्माण झाला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली
ऐरोली प्रभाग क्रमांक १० मधील सेक्टर-१ साई बाबा मंदिराजवळ, भाग्य लक्ष्मी सर्व्हिस सेंटरच्या पाठी मागे एटीएम कंपन्यांना पेपर पुरविणारी पेपर मार्ट कंपनी आहे. या कंपनीतील कागदी कार्बनच्या रुमला अचानक आग लागली. कागदी साहित्यामुळे कागदाने क्षणातच पेट घेतला. या कंपनीतील कागदाच्या वणव्याने नजीकच्या एका केमिकलच्या ड्रमला विळख्यात घेतल्याने ही आग भडकली.

दोन गॅस सिलेंडरचा स्फोट
एमआयडीसीच्या आणि ऐरोली अग्निशमक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेतली. मात्र आगीचा जोर वाडल्याने कोपरखैरणेतील अग्निशमक दलाला पाचारण करावे लागले. मात्र त्यानंतरही नियंत्रण मिळाले नाही. अथक परिश्रमानंतर पेपर कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यावर शर्तीचे प्रयत्न सुरू असताना नजीक आग लागली आहे एका कंपनीतील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा आगीने पेट घेतला. वाशी, कोपरखैरणे व ऐरोली अग्निशमन पथक प्रत्येकी दोन गाड्या वॉटर टँक आणि एमआयडीसीच्या पथकाने आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शर्तीच्या प्रयत्न केले रात्री उशिरापर्यंत या जागेवर नियंत्रण मिळवण्याच्या काम सुरू होते.

- Advertisement -

अनधिकृत झोपड्यांवर कारवाईची मागणी
ऐरोली सेक्टर एक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे परंतु या नागरी वस्तीतच एमआयडीसीने काही लघु उद्योगांना जागा दिल्या आहेत. एखाद्या आगाची घटना घडल्यास या ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणामुळे मोठी जीवित हानी होऊ शकते हे पालिकेच्या आणि एमआयडीसीच्या निदर्शनास आणून दिले आहे. परंतु त्यानंतरही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेले नाही किमान या घटनेनंतर तरी या ठिकाणी असणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यावर, दुकानांवर आणि झोपड्यांवर कारवाई करावी त्याचप्रमाणे या लघुउद्योजकांना इतर सोयी सुविधा असणार्‍या ठिकाणी स्थलांतरित करावे ही प्रमुख मागणी असल्याचे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -