घरनवी मुंबईकळंबोलीत खासगी क्लासमध्ये आग; सुदैवाने जीवितहानी नाही

कळंबोलीत खासगी क्लासमध्ये आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

पनवेल: कळंबोली वसाहतीमधील एका खासगी क्लासमध्ये आग लागण्याची घटना शनिवारी ( ता.8 ) घडली आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी शिकवणीसाठी आलेली मुले वर्गात उपस्थित होती. आग लागताच मुलांनी दप्तर वर्गातच टाकून धूम ठोकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 3 ई येथील एफ 9 या इमारतीमधील 2 माळ्यावर व्यास अकॅडमी नावाने शिकवणी वर्ग चालवले जात आहेत.

रहिवाशी इमारतीत सुरु असलेल्या या क्लासमधील एका वर्गात लावण्यात आलेल्या वातानुकुलीत ( एसी ) यंत्राच्या कोम्प्रेसरला ही आग लागली असल्याची माहिती घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमानुसार वातानुकुलीत यंत्राचे कोम्प्रेसर वर्गाबाहेर असणे आवश्यक आहे. शिकवणी चालकांनी मात्र हे कॉम्प्रेसर वर्गाच्या आतल्या बाजूस ठेवल्याने गर्मीमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसून, दुर्घटनेप्रसंगी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन मार्ग उपलब्ध नव्हते, यामुळे शिकवणी चालकांना नोटीस बजावणार असल्याची माहिती देखील अग्निशमन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेल्या कळंबोली अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.


Toyota च्या 2.96 लाख ग्राहकांचा डेटा लीक; अनेकांना स्कॅम ईमेल येण्याची शक्यता


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -