घरनवी मुंबईवनविभागाला यश! नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत असलेली मगर अखेर जाळ्यात

वनविभागाला यश! नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत असलेली मगर अखेर जाळ्यात

Subscribe

मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत एक मगर आढळली

नवी मुंबईतील बेलापूर भागात असणाऱ्या खाडीत मगर आढळून आल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. यामुळे नागरिकांना या मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर नवी मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत असणारी ही मगर अखेर मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील वेगवेगळ्या नाल्यांमध्ये भटकणाऱ्या मगरीची वनविभागानं सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनपा मुख्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत एक मगर आढळली होती. या मगरीपासून बचाव व्हावा, यासाठी या मगरीला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावं, अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र यावेळी वनविभागाकडून दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने स्थळ पाहणी करून देखील मगर पकडण्यासाठी कुठलीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे, याठिकाणी मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. मात्र आता वनविभागाकडून या मगरीला ताब्यात घेतल्याने नागरिकांना सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

- Advertisement -

६.४३ फूट लांब ३५.४ वजनाची मगर

बेलापूर परिसरात नाल्यात आढळलेली ही मगर ६.४३ फूट लांब तर ३५.४ किलोग्राम वजनाची होती. ही मगर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नाल्यांमध्ये भटकत असल्याची माहिती आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मगरीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही याआधी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोमवारी रात्री ११ वाजता या मगरीला पकडण्यासाठी नियोजन केले अखेर वनविभागाला ही मगर जाळ्यात पकडण्यात यश आले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -