घरनवी मुंबईनवी मुंबई महापालिकेतर्फे रुग्णांचे विनामूल्य एचआरसीटी स्कॅनिंग

नवी मुंबई महापालिकेतर्फे रुग्णांचे विनामूल्य एचआरसीटी स्कॅनिंग

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथील कोविड सेंटरमध्ये सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त एचआरसीटी डायग्नोस्टिक स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील ९६० एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए) लोकार्पण करण्यात आले.

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये पिडीयाट्रिक सुविधांसह आवश्यक वाढ केली जात असून कोरोनाबाधित रुग्णांवर जलद उपचार होण्यासाठी कोविड सेंटरमध्येच एचआरसीटी स्कॅनिंग मशीनची व्यवस्था केल्याने उपचार वेळेत होऊन रुग्ण बरा होण्यासाठी याचा फार फायदा होईल, असे सांगत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्यास ९६० लीटर प्रती मिनिट क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम केल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
पालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथील कोविड सेंटरमध्ये सीएसआर अंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त एचआरसीटी डायग्नोस्टिक स्कॅनिंग मशीनचे लोकार्पण तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील ९६० एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए) लोकार्पण करताना पालकमंत्र्यांनी मत व्यक्त केले. यावेळी खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डेनिमित्त कोविड विरोधातील लढ्याच समर्पित भावनेने अथक सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा प्रतिकात्मक सन्मान म्हणून सिडको कोविड सेंटरमधील डॉ. शिवानी मिश्रा यांना सन्मानीत करण्यात आले.
कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज ११०० हून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यापैकी काही रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनिंग करण्यासाठी त्यांना वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात न्यावे लागत होते. यामध्ये काही रूग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचे निदर्शनास येत होते. याकरता सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एचआरसीटी स्कॅनिग मशीन कार्यान्वित करणेबाबत महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात येत होते. यामध्ये ‘फ्रीडम फॉर यू फाऊंडेशन’ यांनी सहयोगाची भूमिका घेत डाऊ केमिकल्स्‍, बीएएसएफ कंपनी, इवोनिक  इंडिया कंपनी तसेच क्रोडा इंडिया कंपनी यांच्या उद्योग समुहांमार्फत सीएसआरचे नियोजन करुन त्या अंतर्गत महापालिकेला एचआरसीटी स्कॅनिंग मशीन प्रदान केली. यामुळे या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांसाठी त्याच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाली. अशाप्रकारे कोविड सेंटरमध्येच एचआरसीटी सुविधा उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.
मशीनद्वारे दररोज अंदाजे १०० कोरोनाबाधित रूग्णांचे एचआरसीटी स्कॅनिंग होईल. त्यामुळे रुग्णांवर तत्परतेने उपचार करता येणार आहेत. या मशीनमध्ये आवश्यकतेनुसार लहान मुलांचेही एचआरसीटी स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये प्रती स्कॅन ४००० हजार रुपये इतका अंदाजे खर्च येतो. मात्र नवी मुंबई पालिकेच्यावतीने कोरोना रुग्णांचे एआरसीटी स्कॅनिंग विनामूल्य केले जाणार आहे. याकरता १ कोटी ८५ लाख रुपयांचा सीएसआर उपलब्ध झाला असून याची क्षमता ३२ स्लाईस इतकी आहे. यावेळी सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -