डोळ्या देखत विझला स्वप्नांचा दिवा; अखेर अंबिका इमारतीवर हातोडा

मंगळवारी ही इमारतीवर जेसीबीच्या मदतीने नवी मुंबईतील दिघा परिसरातील अंबिका इमारत जमिनदोस्त करण्यात करण्यात आली.

अंबिका इमारतीवर हातोडा

नवी मुंबईतील दिघा परिसरातील नागरिकांनी घुसखोरी केलेली अंबिका इमारत बांधकाम व्यवसायिक आणि एमआयडीसीच्या सहकार्याने रविवारी पुन्हा सील करण्यात आली होती. त्यांनतर मंगळवारी ही इमारतीवर जेसीबीच्या मदतीने जमिनदोस्त करण्यात कारवाई सुरु करण्यात आली. दिघा येथील एमआयडीसीचा भूखंड क्रमांक एक्स २१ हा (६ हजार ३१८ चौ.मी.) एमआयडीसीने बांधकाम व्यवासिकाला विकला आहे. या भूखंडावर अनाधिकृतपणे अंबिका इमारत उभी होती. ही इमारत कोर्ट रिसिवरच्या ताब्यातून सील करुन एमआयडीसीला वर्ग करण्यात आली होती. पण त्यानंतर पुन्हा रहिवाशांनी इमारतीचा ताबा घेतला होता. त्यामुळे या इमारतीवर कारवाई कोणी कारवाईची?, असा प्रश्न निर्माण झाला होता.

एमआयडीसीविरोधात बांधकाम व्यवसायिकाने न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने एमआयडीसी व बांधकाम व्यावसायिकांने पोलीस बंदोबस्तात संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रविवारी पोलीस बंदोबस्तामध्ये ही इमारत कोर्ट रिसीवर, एमआयडीसी यांनी सील केली होती. दरम्यान, मंगळवारी इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. मागील तीन दिवसांपासून पोलिसांनी या ठिकाणी तळ ठोकून बसले आहे. अंबिका इमारतीवर कारवाई होऊ नये, यासाठी इमारतीमधील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायलयात देखील धाव घेतली होती. पण तिथे दिलासा मिळालेला नसल्याने ७२ घरांच्या या इमारतीवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. डोळ्यादेखत इमारत जमिनदोस्त होत असल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा –

अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोंबड्यांसह मेंढ्यांचा बळी