घरनवी मुंबईखारघरवासियांचे आरोग्य धोक्यात; नागरिकांना खावा लागतोय केमिकलयुक्त भाजीपाला

खारघरवासियांचे आरोग्य धोक्यात; नागरिकांना खावा लागतोय केमिकलयुक्त भाजीपाला

Subscribe

पालिका, सिडको प्रशासन झोपलंय काय?

संपूर्ण खारघरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून खारघरवासियांना केमिकलयुक्त पाण्यावर पिकवलेला भाजीपाला खावा लागत आहे. पनवेल मनपा, सिडको व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून खारघर रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मागील अनेक वर्षांपासून सदर भाजीपाला पिकवला जात आहे. भाजीपाला पिकविण्यासाठी तळोजा एमआयडीसीतून आलेले केमिकलयुक्त आणि गटाराचे पाणी वापरले जात आहे. सदर बाब लक्षात येताच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सामाजिक नेते तथा खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पनवेल मनपा, सिडको व खारघर पोलीस प्रशासनाकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. केमिकलयुक्त पाणी व गटाराच्या पाण्यावर भाजीपाला पिकविणाऱ्या संबधितांवर व त्यांना अभय देणाऱ्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.

खारघरच्या सर्व भाजीपाला मार्केटमध्ये अगदी हिरवीगार ताजी भाजी घेताना नागरिकांना समाधान मिळते. स्वस्त व मस्त ताजी हिरवी भाजी खाल्ल्याचे समाधान गेली अनेक वर्ष खारघरवासी मिळवीत आहेत. पण हि भाजी केमिकलयुक्त व गटाराच्या पाण्यावर खारघर परिसरातच पिकवली जाते, याची भनक दखल खारघरवासियांना नव्हती. सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी सदर बाब उघडकीस आणल्यानंतर खारघरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खारघर रेल्वेस्थानकाजवळ सेक्टर २ व सेक्टर ९ या सिडको क्षेत्रात सुमारे शंभर एकर जमिनीवर भाजीपाला केला जातो.

- Advertisement -

सिडकोच्या शेकडो एकर जमिनीवर राजरोसपणे बेकायदा भाजीपाला शेती केली जात असताना सिडको प्रशासन मात्र काहीही कारवाई करीत नाही. भूमाफिया काही सिडको अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा काळाबाजार करीत असल्याचे बोलले जात आहे. या काळ्या धंद्याला पनवेल महापालिका प्रशासनाचे काही अधिकारी देखील खतपाणी घालत आहेत. खारघरवासियांना पुरविला जाणारा भाजीपाला केमिकल आणि गटाराच्या पाण्यावर पिकवला जातो, याची भनक पनवेल मनपाच्या खारघर विभाग कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती कसा नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे मानवी जीवनावर धोक्याचे संकट कायम असताना अशा प्रकारे काही माफिया लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. दरम्यान, संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, खारघरवासियांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करण्यासाठी भाजीपाला माफिया व संबंधितांना अभय देणाऱ्या मनपा अधिकारी व सिडको अधिकाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विजय पाटील यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व सिडको व्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

खारघरवासियांचे आरोग्य धोक्यात; नागरिकांना खावा लागतोय केमिकलयुक्त भाजीपाला
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -