Homeनवी मुंबईHMPV : एचएमपीव्ही हा हंगामी आजार, काळजी घ्या, घाबरू नका, पनवेल महापालिकेचे...

HMPV : एचएमपीव्ही हा हंगामी आजार, काळजी घ्या, घाबरू नका, पनवेल महापालिकेचे आवाहन

Subscribe

पनवेल : एचएमपीव्ही (HMPV) विषाणूचा एक रुग्ण भारतात कर्नाटकमध्ये आढळल्याने देशात या विषाणूची चर्चा सुरू झाली आहे. कारण या विषाणूने चीनमध्ये उद्रेक केला आहे. असे असले तरी राज्यात अजून एचएमपीव्हीचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागाने सावधानता बाळगली असून पनवेल महापालिकेनकडूनही योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील रहिवासांनी घाबरू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

मार्च 2020 मध्ये चीनमधूनच आलेल्या कोरोनाच्या विषाणूने भारतासह जगभरात खळबळ उडवली होती. कोट्यवधी लोकांचे जीव गेले होते. जवळपास वर्षभर कामकाज ठप्प झाले होते. लोकजीवन पूर्ववत व्हायला दोन वर्षे लागली होती. या पार्श्वभूमीवर एचएमपीव्ही विषाणूबाबत जास्त काळजी घेतली जात आहे. मात्र, हा विषाणू कोरोनाइतका नक्कीच धोकादायक नाही. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. एचएमपीव्ही तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 मध्ये आढळला होता. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. म्हणूनच लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

हेही वाचा…  Fish Producton : कोकणातील मासे कुणी खाल्ले, मत्स्य उत्पादनात महाघट

एवढी काळजी घ्या!

  • खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका
  • हात वारंवार स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा
  • ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
  • पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या

एवढे करा

  • हस्तांदोलन (Shake Hand) टाळण्याचा प्रयत्न करा
  • टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका
  • आजारी लोकांजवळचा जाऊ नका
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या

(Edited by Avinash Chandane)