घरनवी मुंबईIAS Transfers : सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय सिंघल

IAS Transfers : सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय सिंघल

Subscribe

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे विजय सिंघल यांनी आज (23 फेब्रुवारी) मावळते उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्वीकारली. सिडकोचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या मुंबईतील निर्मल भवन येथे विजय सिंघल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. (IAS Transfers Vijay Singhal as Managing Director of CIDCO)

हेही वाचा – Joshi – Patni : गुरू शिष्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप; सर्वत्र हळहळ व्यक्त

- Advertisement -

विजय सिंघल हे 1997 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी रुरकी येथून बी. टेक (स्थापत्य अभियांत्रिकी), आयआयटी दिल्ली येथून ‘इमारत विज्ञान आणि बांधकाम व्यवस्थापन’ या विषयात एम. टेक आणि किंग्ज कॉलेज, लंडन येथून सार्वजनिक सेवा धोरण व व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ही पदे भूषविली आहेत. सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी विजय सिंघल हे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

विजय सिंघल यांना “उत्कृष्ट लोक प्रशासनाकरता” ‘पंतप्रधान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मुंबई शहरास ‘भारतातील सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी’ बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेत त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत केलेल्या तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी त्यांना भारत सरकारतर्फे ‘डिजिटल इंडिया अवॉर्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP VS NCP-SP : आता “तुतारी” वाजेल की…; भाजपाच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

राज्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त आणि मोकळ्या तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणुक प्रक्रियेशी सबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या राज्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात विजय सिंघल यांचेही नाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -