घरनवी मुंबईधोकादायक! शाळेच्या प्रांगणात बेकायदेशीर पार्कींग

धोकादायक! शाळेच्या प्रांगणात बेकायदेशीर पार्कींग

Subscribe

पनवेल मनपा क्षेत्रातील शाळांच्या प्रांगणात आता बेकायदेशीर पार्कींग सुरू झाले आहे. पालिका प्रशासन अथवा वाहतूक विभागाचे मात्र याकडे दुलक्ष आहे.

पनवेल मनपाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या अनेक इमारतीकडे पनवेल मनपाचे दुर्लक्ष आहे. धोकादायक म्हणून घोषित केले, मात्र पुढे काय असा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, पनवेल मनपा क्षेत्रातील शाळांच्या प्रांगणात आता बेकायदेशीर पार्कींग सुरू झाले आहे. पालिका प्रशासन अथवा वाहतूक विभागाचे मात्र याकडे दुलक्ष आहे. सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणातील कचरा तातडीने हलवून स्वछता राखण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेलचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हाच प्रकार पनवेल मधील शाळेच्या बाबतीत घडले आहे. दरम्यान, शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. येथे ज्ञानदानाचे अनमोल कार्य केले जाते. सध्या ह्या शाळेत अतिक्रमण करून कारवाई केलेला कचरा येथे साचविला जातो. शाळेच्या मैदानात कचरा बघून शहरातील माजी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी येथे घडले आहेत. त्यामुळे तातडीने स्वच्छ करून मैदान मोकळे करण्यात यावे. अन्यथा माजी विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत याची नोंद प्रशासनाने घ्यावी.

- Advertisement -

सध्या या शाळेत अतिक्रमण करून कारवाई केलेला कचरा येथे साचविला जातो. शाळेच्या मैदानात कचरा बघून शहरातील माजी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी येथे घडले आहेत. त्यामुळे तातडीने स्वच्छ करून मैदान मोकळे करण्यात यावे.
– प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका

शाळेची इमारत धोकादायक घोषित झाल्याने विद्यार्थ्यांची अन्न शाळेत व्यवस्था करण्यात केली आहे. शाळेच्या जागेवर बांधा, वापरा आणि हस्तांरीत करा या तत्वावर बहुमजल वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव नगरपरिषद असल्यापासून विचाराधीन आहे. मागील काही वर्षात या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्यात आला नव्हता. पनवेलमधील सर्वसामान्य असंख्य विद्यार्थी, याशिवाय कामगारांची शाळाबाह्य इतकेच नव्हे तर मूळचे नेपाळचे असणारे अनेक विद्यार्थी सरस्वती मंदिर शाळेतून मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी सामाजिक, राजकीय, यासारख्या विविध यशस्वी झाले आहेत.

- Advertisement -

सध्या शाळेला डंम्पिंग ग्राउंड स्वरूप आले आहे. येथे महापालिकेची व इतर अवजड वाहने उभी असतात. शाळेची झालेली दुरवस्था पाहून माजी विद्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पनवेलचा ५० वर्ष जुना शैक्षणिक वारसा जतन करण्यासाठी शाळा नव्याने बांधण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणातील कचरा तातडीने हलवून स्वछता राखण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेलचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा –

दुकानांबाहेरील स्त्री देहाच्या प्रतिकृती हटविण्यात पालिका हतबल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -