Homeनवी मुंबईCrime: समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने हत्या ; कामोठेतील मायलेकाच्या हत्येचे गूढ उकलले

Crime: समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने हत्या ; कामोठेतील मायलेकाच्या हत्येचे गूढ उकलले

Subscribe
नवी मुंबई : ३१ डिसेंबर रोजी एकीकडे सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कामोठे येथील एका सोसायटीत आई आणि मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी उरण परिसरातून दोघांना ताब्यात घेतले असून समलैंगिक संबंधाला नकार दिल्याचे मुलाची आणि मुलाच्या मारहाणी बाबत विचारणा केल्याने त्याच्या ७० वर्षीय आईची देखील गळा अवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. अवघ्या २४ तासात नवी मुंबई पोलीस व गुन्हे शाखेने हत्येतील दोघा आरोपींना बेडया ठोकल्या आहेत.
कामोठे सेक्टर-६ मधील ड्रीमलँड या अपार्टमेंटमध्ये गीता जग्गी (७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी (४५) राहात होते. बुधवार १ जानेवारी रोजी सायंकाळी जग्गी यांच्या घरातून गॅस लीक होत असल्याचे लक्षात आले. ही माहिती शेजार्‍यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. पोलिसांची पथके ड्रीमलँड अर्पाटमेंटमध्ये पोहोचली. घर आतून बंद असल्याने अग्निशमनच्या जवानांनी कटरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला.यावेळी गीता व जितेंद्र यांचे मृतदेह दोन बेडरूममध्ये आढळले. पोलिसांना त्यांचे मृतदेह पाहून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
हेही वाचा…Suresh Dhas : “संतोष देशमुखांच्या आरोपींना बीड जिल्ह्याबाहेरील तुरुंगात पाठवावे,” सुरेश धसांनी सांगितलं मोठे कारण
घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस परिमंडळ-२ चे उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, अजयकुमार लांडगे यांनी गुन्हे शाखा कक्ष-२ व कक्ष ३ यांची विविध तपास पथके तयार केली. तपासा दरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे चौकशी करुन संज्योत दोडके (वय १९) या संशयीत आरोपी बद्दलची माहिती पथकाला दिली. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता पोलीस तुकाराम सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संज्योत दोडके आणि शुभम नारायणी (वय १९) याला उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी विचारणा केली असता मयत जितेंद्र जग्गी याने ३१ डिसेंबरला या दोघां मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावले. तिघेही घरीच दारु प्यायायले. त्यानंतर मयत जितेंद्र याने समलैंगिक संबंधासाठी शुभमला आग्रह केला. त्याला नकार दिल्याने जितेंद्रच्या डोक्यात एक्सटेंशन बोर्ड घालून हत्या केली. तर मुलाला मारहाण होत असताना मध्यस्थी करीत विचारणा करणारी जितेंद्रची आई गीता जग्गी हिची गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या घटनेचा अधिक तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे करीत आहेत.
हेही वाचा…Politics : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होईल; वडेट्टीवारांच्या आरोपावर महाजनांचा पलटवार
सदरची कामगिरी सपोआ, पनवेल विभाग अशोक राजपूत, सपोआ गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, गुन्हे शाखा कक्ष ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, कामोठे पोलीस ठाणे सपोनि अजित कानगुडे, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, गुन्हे शाखा कक्ष २ सपोनि संतोष चव्हाण, सपोनि एकनाथ देसाई, सपोनि सुरज गोरे, पोउपनि लिंगराम देवकाते, पोउपनि आकाश पाटील, गुन्हे शाखा कक्ष ३ पोउपनि किरण राऊत, कळंबोली पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष २ चे पोहवा रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजीत कानु, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी पार पाडली.
(Edited by Dnyaneshwar Jadhav)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -