Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई पनवेलमधील कासाडी नदीचे पाणी प्रदूषित

पनवेलमधील कासाडी नदीचे पाणी प्रदूषित

Subscribe

  प्रदूषणाच्या मुद्यामुळे तळोजे औद्योगिक क्षेत्रातुन वाहणारी कासाडी नदी नेहमीच चर्चेत असते. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यामधून नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याने नदी पात्रातील पाण्याच्या चाचण्या करून आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने कासाडी नदी पुनर्जीवित करण्यासाठी २३५ पानांचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे. या अहवालामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासाडीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पनवेल:  प्रदूषणाच्या मुद्यामुळे तळोजे औद्योगिक क्षेत्रातुन वाहणारी कासाडी नदी नेहमीच चर्चेत असते. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यामधून नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याने नदी पात्रातील पाण्याच्या चाचण्या करून आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने कासाडी नदी पुनर्जीवित करण्यासाठी २३५ पानांचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे. या अहवालामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासाडीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळोजे औद्योगिक वसाहतीतून वाहणार्‍या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटी या संस्थेने काढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर एमआयडीसीतील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यातील द्रवरूप ऑक्सिजनची घनता कमी झाली आहे. तसेच रसायनांचे प्रमाण वाढल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

 नदीमुळे भूजल पिण्याअयोग्य
कासाडी नदीचे स्वरूप मर्यादित नसून ही नदीपुढे तळोजे खाडीत वाहत जाते. त्यामुळे नदीतील प्रदूषित पाण्याच्या दुर्गंधीने किनारी असणार्‍या वसाहतींमधील नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कासाडी नदीतील पाण्यामुळे जलचर, पाण्यातील वनस्पती आदी सजीवांच्या जीवाला धोका पोहोचला आहे. तसेच हे पाणी भूजल साठ्यात मिसळल्यामुळे पिण्याचे पाणी, माती प्रदूषित झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -