Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई खारघरमध्ये माघी गणेशोत्सव संपन्न

खारघरमध्ये माघी गणेशोत्सव संपन्न

खारघरचा राजा ट्रस्टचे भव्य आयोजन

Related Story

- Advertisement -

खारघरमध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खारघर सेक्टर १२ येथील खारघरचा राजा गणेश मंदिरात भव्य माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खारघर आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शेकडो भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतले. खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष विजय पाटील आणि भाजपा खारघर -तळोजा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील यांच्या विशेष पुढाकाराने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

वर्षी माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कीर्तनकार सोनालीताई महाकाय आणि हेमंत मोरे यांच्या कीर्तनाने सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. गायक श्वेता ठाकूर व नयन गवळी यांच्या स्वरप्रभा संगीत मैफिलले भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले झाले. खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, भाजपा खारघर -तळोजा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा तथा श्री समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता पाटील यांच्या विशेष पुढाकाराने महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

यावेळी भाजपा पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्षा रत्नाताई घरत , पनवेलच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना ठाकूर , महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील , नगरसेविका आरती नवघरे , जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबिन्द्रे , जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा आशा बोरसे , उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, चिटणीस मधुमिता जैन, कोषाध्यक्षा वैष्णवी शिंदे, सदस्य राजश्री नायडू , शकुंतला लवटे, मीरा खान , सौ शामला , स्मिता आचार्या तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.यावेळी हळदी कुंकू सोहळ्यास महिलांच्या उखाणे घेणे तसेच बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

माघी गणेशोत्सव आयोजनात खारघर मधील अनेक सामाजिक संस्थांनी विशेष सहयोग दिले, उत्सव यशस्वी करण्यासाठी तात्यासाहेब घाडगे, अशोक कांबळे, प्रदीप म्हात्रे, विजय संघानी, अमरचंद्र चौधरी, गजानन लांघी, एकनाथ मण्यार, श्रीकांत पाटील, कमलाकर तोडकर, दिनकर घरत, नवलकुमार मोरे, आनंद कुमार, नवनीत मारू, दीपक पाटील, कीर्ती नवघरे, अशोक पाटील, सुनील मोहिते, विनय पाटील, शिवाजी घाडगे, मेहबूब मुलानी, मनोहर पवार, जगदीश शेट्टी आदींनी विशेष मेहनत घेतल्याची माहिती महोत्सवाच्या निमंत्रक मीनल पाटील यांनी दिली.

- Advertisement -