घरनवी मुंबईपनवेलमधून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त; तीन आरोपींना अटक 

पनवेलमधून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त; तीन आरोपींना अटक 

Subscribe

तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत गोवा निर्मित विदेशी मद्याचे तेराशे दहा बॉक्स आणि वाहनासह उत्पादन शुल्क विभागाने एक कोटी तीन लाख १८ हजार दोनशे रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीनुसार खिडूकपाडा येथे छापा टाकून ५१ लाख १२ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पनवेल: तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत गोवा निर्मित विदेशी मद्याचे तेराशे दहा बॉक्स आणि वाहनासह उत्पादन शुल्क विभागाने एक कोटी तीन लाख १८ हजार दोनशे रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीनुसार खिडूकपाडा येथे छापा टाकून ५१ लाख १२ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकाने जय मल्हार ढाब्याच्या समोरील रोडवर, शिरढोण गावाच्या हद्दीत, पनवेल येथे सापळा रचून टाटा कंपनीचा बारा चाकी मालवाहक ट्रक (एमएच०४/ ईवाय९२६८) या वाहनामधून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे एकूण १ हजार ३१० बॉक्स व वाहनासह एकूण १ कोटी ३ लाख १८ हजार २०० रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली मद्य सापडून आले. ही दारु मुंबईत आणून कळंबोली (खिडूकपाडा) येथील लोखंड पोलाद बाजारातील एका गोदामात ठेवली जात होती. त्यानंतर या गोदामातून मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात होती. गुन्ह्यातील अटक केलेल्या तीन आरोपींपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार शिवलखन मोतीलाल केवट यास बामन डोंगरी, उलवे, या परिसरातून ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार गोडावून नं. १, प्लॉट नं. १२९०, केडब्लयुसी नोड, खिडूकपाडा, येथे दारुबंदी गुन्हयांतर्गत छापा घालून गोडावूनमधून गोवानिर्मित व विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे ७०९ बॉक्स असा एकूण ५१ लाख १२ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन शिवलखन मोतीलाल केवट याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्याशी संबंधित इसमांचा तपास चालू आहे.
या गुन्हयात अद्यापपर्यंत उत्पादन शुल्क विभागाने १ कोटी ५४ लाख ३१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संताजी लाड, निरीक्षक मनोज चव्हाण, निरीक्षक पाटणे, दुय्यम निरीक्षक, पाडळे, फटांगरे, गायकवाड, कांबळे तसेच जवान सर्वश्री बोडरे, चिलगर,रणखांब, रवि पाटील, धनाजी दळवी, यांनी भाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास संताजी लाड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक मुंबई हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. आतापर्यंतची राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेलमधील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

विटांआड मद्याचे बॉक्स
खिडुकपाडा हद्दीत असणार्‍या मोठ्या गाळ्यामध्ये संपूर्ण ट्रक शटर उघडून आतमध्ये जात होता व ते शटर बंद करून हे आरोपी दारूचे बॉक्स उतरत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या गाळ्यामध्ये सिमेंटच्या विटा ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याच्या आतमध्ये मद्याचे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोणालाही संशय येत नसे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -