घरनवी मुंबईनवी मुंबईत १४ हजार ३३२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर; पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत उद्दिष्टपूर्ती

नवी मुंबईत १४ हजार ३३२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर; पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत उद्दिष्टपूर्ती

Subscribe

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत (पीएम स्वनिधी) कर्ज वितरण करण्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उत्तम झालेले असून विविध राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १४हजार ३३२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सातत्याने घेतलेल्या आढाव्यानुसार तसेच बँकांची विशेष बैठक घेऊन त्यांना दिलेल्या सूचनांनुसार ही कर्ज मंजूरी प्रक्रिया गतीमानतेने करण्यात आली.

नवी मुंबई: केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत (पीएम स्वनिधी) कर्ज वितरण करण्यात नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उत्तम झालेले असून विविध राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १४हजार ३३२ पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सातत्याने घेतलेल्या आढाव्यानुसार तसेच बँकांची विशेष बैठक घेऊन त्यांना दिलेल्या सूचनांनुसार ही कर्ज मंजूरी प्रक्रिया गतीमानतेने करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या ८ विभाग कार्यालय क्षेत्रात २२ हजार ३८ इतक्या मोठ्या संख्येने पथविक्रेत्यांचे अर्ज भरून घेण्यात आलेले असून त्यामधील १४ हजार ३३२ पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजेच शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या ११० टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे. यामध्ये आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी कार्यप्रणालीचे सुयोग्य नियंत्रण केले असून समाज विकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी योजनेच्या अंमलबजावणीकडे काटेकोर लक्ष दिलेले आहे. समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे यांच्यासह सर्व आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी समाज सेवक, समुह संघटक व आपल्या विभाग कार्यालयातील कर्मचारीवृंदाची मदत घेऊन अथक प्रयत्न करीत उद्दीष्टापेक्षा अधिक उत्तम कामगिरी केलेली आहे.

कर्ज वितरणात महत्वाची कामगिरी
पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यादृष्टीने समाज विकास विभागाने विभाग कार्यालयांच्या मदतीने योग्य नियोजन केले व लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. याची परिणीती म्हणजे ११० टक्के इतकी उद्दिष्टपूर्ती झाली असून यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वितरणात महत्वाची कामगिरी केली आहे.

- Advertisement -

सातत्यपूर्ण प्रयत्न होणार
पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत योजनेअंतर्गत पथमत.१० हजार रक्कमेचे कर्ज देण्यात येत असूn त्याची व्यवस्थित पूर्ण परतफेड झाल्यानंतर १८ महिन्यांसाठी २० हजार इतके व्दितीय कर्ज देण्यात येते. तसेच ते विहित कालावधीत फेडल्यानंतर ३६ महिन्यांसाठी ५० हजार इतके तृतीय कर्ज देण्यात येते. ज्या विभाग कार्यालय क्षेत्रात कमी अर्ज आले आहेत अशा ठिकाणी जनजागृती करण्याचे काम समाजविकास विभागामार्फत निरंतर सुरु राहणार असून जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा यादृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -