Eco friendly bappa Competition
घर नवी मुंबई -महागृहनिर्माण योजना; सिडकोने केले ७,८४९ नागरिकांचे घरांचे स्वप्न पुर्ण

-महागृहनिर्माण योजना; सिडकोने केले ७,८४९ नागरिकांचे घरांचे स्वप्न पुर्ण

Subscribe

नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये परवडणार्‍या दरातील ७,८४९ घरांचे स्वप्न सिडकोने पुर्ण केले आहे. सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ करीता संगणकीय सोडत शुक्रवारी सिडको भवन येथे पार पडली. सदर संगणकीय सोडत सुरेश कुमार, माजी लोकायुक्त, मोईझ हुसेन माजी यांच्या पर्यवेक्षणाखाली पारदर्शक व निष्पक्षपणे संपन्न झाली. या प्रसंगी महागृहनिर्माण योजनेत यशस्वी ठरलेल्यांचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी उपाध्यक्ष यांनी अभिनंदन केले.

नवी मुंबई: नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये परवडणार्‍या दरातील ७,८४९ घरांचे स्वप्न सिडकोने पुर्ण केले आहे. सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ करीता संगणकीय सोडत शुक्रवारी सिडको भवन येथे पार पडली.
सदर संगणकीय सोडत सुरेश कुमार, माजी लोकायुक्त, मोईझ हुसेन माजी यांच्या पर्यवेक्षणाखाली पारदर्शक व निष्पक्षपणे संपन्न झाली. या प्रसंगी महागृहनिर्माण योजनेत यशस्वी ठरलेल्यांचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी उपाध्यक्ष यांनी अभिनंदन केले.
सिडकोतर्फे २४ ऑक्टोबर २०२२ रोजी ही महागृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये या परवडणार्‍या दरातील ७,८४९ सदनिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उलवे नोड हा वेगाने विकसित होणारा व परिवहनदृष्ट्या समृद्ध नोड आहे. या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, आगामी एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवेला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिडकोतर्फे साकारण्यात आलेली ही आत्तापर्यंतची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची सर्वात मोठी योजना होती. नागरिकांतर्फे या योजनेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
महागृहनिर्माण योजना दिवाळी-२०२२ च्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -