घरनवी मुंबईभाजपचे विशेष जनसंपर्क अभियान यशस्वी करा - आमदार गणेश नाईक 

भाजपचे विशेष जनसंपर्क अभियान यशस्वी करा – आमदार गणेश नाईक 

Subscribe

येत्या ३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ३० मे २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान भाजपाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. विशेष जनसंपर्क अभियान यशस्वी करा, भारतीय जनता पक्षाचा लोककल्याणकारी विचार आणि जनहिताय कार्य घराघरात, शेवटच्या घटकापर्यंत पोहोच असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी येथे केले.

बेलापूर : येत्या ३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ३० मे २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान भाजपाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. विशेष जनसंपर्क अभियान यशस्वी करा, भारतीय जनता पक्षाचा लोककल्याणकारी विचार आणि जनहिताय कार्य घराघरात, शेवटच्या घटकापर्यंत पोहोच असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी येथे केले. नवी मुंबई शहर जिल्हामधील या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, नवीन गवते, माजी नगरसेविका माधुरी सुतार,भारती पाटील, शशिकला पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकास करतो आहे. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा विश्वामध्ये पोहोचला असून आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क, सरकारी योजनांचे लाभार्थी संपर्क, समाजातील विविध घटकांशी संपर्क, ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा देशातील करोडो नागरिकांना लाभ झाला आहे त्या योजना व्यापक स्तरावर जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असे आमदार नाईक यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा आणि जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे. जनसंपर्कातून जनतेच्या कथा आणि व्यथा आपल्याला जाणून घेता येतात आणि त्याची सोडवणूक आपल्याला करता येते. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा त्याचबरोबर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष ताकदीने काम करत आहे.
– गणेश नाईक,
आमदार, ऐरोली विधानसभा मतदार संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -