घरनवी मुंबईनवी मुंबईतील महापेच्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग

नवी मुंबईतील महापेच्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग

Subscribe

नवी मुंबईतील महापे परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मंगळावारी सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली.

नवी मुंबईतील महापे परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मंगळावारी सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

नवी मुंबईच्या शिळ फाटा परिसरातील अडवली भूतवली गावाजवळ ही घटना घटना घडली. या गावाच्या परिसरात असलेल्या महापे एमआयडीसीतील एका गोदामाला आग लागली. या गोदामाला लागलेली आग संबंधित परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये पसरल्याचं समजतं. त्यामुळं स्थनिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

या आगीच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र गोदामाला लागलेल्या आगीमुळं वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान, या गोदामाच्या शेजारील भागातच पेट्रोल-डिझेलची लाईन असल्यामुळं संबंधित परिसरात आग वाढण्याची चिंता वाढली आहे.

सद्यस्थितीत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहेत. तसंच, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय भारत पेट्रोलियमचं पथक आणि स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या एमआयडीसीच्या शेजारील भागात नाला असून, या नाल्यातील केमिकलसदृश वस्तूंमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘गैरसमज काही लोक करून देतात’; मुस्लिम मनसैनिकांच्या नाराजीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -