घरनवी मुंबईएपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

Subscribe

बाजारसमित्यांमध्ये शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून ओळख असणा-या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये गुरुवारी माथाडी कामगारांनी काम बंद केले. त्यामुळे बाजारसमित्यांमध्ये आलेल्या शेतमालाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. कांदा बटाटा मार्केटमध्ये आलेल्या माल 50 किलोपेक्षा आधिक असल्यास उचलणार नसल्याचा इशारा माथाडी कामागरांनी दिला होता. मात्र तरीही त्यावर तोडगा न काढण्यात आल्यामुळे अखेर आज काम बंद आंदोलन करण्यात आले.

माजी मंत्री तथा एपीएमसी संचालक शंशिकात शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी सभापती अशोक डक, संचालक अशोक वाळुंज यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये येत्या तीन ते चार दिवसात यांवर तोडगा काढणार असल्याची चर्चा झाल्यांनतर काम बंद आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले.

- Advertisement -

शेतमालाच्या गोणीचे वजन 50 किलोपेक्षा अधिक असू नये, असा नियम करण्यात आला आहे. हा नियम फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, मसाला मार्केट व धान्य मार्केटमध्ये लागू करण्यात आला आहे. फळ मार्केट, भाजीपाला मार्केट आणि मसाला मार्केट, धान्य मार्केटमध्ये या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पण कांदा बटाटा मार्केटमध्ये यांची अंमलबजावणी होत नसल्यानं माथाडी कामगार आक्रमक झाले. आणि त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं. एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद केले. एपीएमसी प्रशासन व व्यापारी यासंदर्भातील शासन आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे, असल्याचा आरोप माथाडी कामगांरानी यावेळी केला.

कांदा बटाटा मार्केट मध्ये पन्नास किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या गोणी न उचलण्याचा निर्णय माथाडी कामगारांनी घेत आंदोलन केले होते. पण आमदार शशिंकात शिंदे, सभापती अशोक डक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत येत्या तीन ते चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्यांनतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत काम सुरू केले.
– अशोक वाळुंज, संचालक एपीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -