घरनवी मुंबईदिघा स्थानकातील सुविधांबाबत मंत्री दानवेंसोबत बैठक; आमदार गणेश नाईक यांची माहिती

दिघा स्थानकातील सुविधांबाबत मंत्री दानवेंसोबत बैठक; आमदार गणेश नाईक यांची माहिती

Subscribe

ट्रान्स हार्बर मार्गावरील पूर्णत्वाकडे जात असलेल्या नवीन दिघा स्थानकाच्या कामाचा पाहणीदौरा आमदार गणेश नाईक यांनी केला. दिघा स्थानकामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याविषयी तसेच येथील अडचणींवर उपाय योजना करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर येत्या ३ मार्च रोजी बैठक होणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. खास करून या स्थानकातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

बेलापूर : ट्रान्स हार्बर मार्गावरील पूर्णत्वाकडे जात असलेल्या नवीन दिघा स्थानकाच्या कामाचा पाहणीदौरा आमदार गणेश नाईक यांनी केला. दिघा स्थानकामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याविषयी तसेच येथील अडचणींवर उपाय योजना करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबर येत्या ३ मार्च रोजी बैठक होणार असल्याची माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. खास करून या स्थानकातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, स्थायी समितीच्या माजी सभापती नेत्रा शिर्के, स्थानिक नगरसेवक नवीन गवते, एमआरव्हीसी आणि रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२००९ साली तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची मागणी केली होती आणि हे स्थानक उभे राहण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक तयार झाल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे देखभाल होत नाही असा अनुभव आहे. रेल्वे ट्रॅकमधील स्वच्छता काटेकोरपणे होत नाही. या पाश्वर्र्भूमीवर येथील स्वच्छतेची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेला देऊन त्या मोबदल्यात जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न कमविण्याचे अधिकार महापालिकेला द्यावेत, अशी सूचना करतानाच दिघा स्थानकात उपलब्ध होणार्‍या रोजगाराच्या संधी आणि अन्य कामे यासाठी येथील स्थानिकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. दिघा स्थानकाच्या निर्मितीसाठी अंदाजे ९० करोड रुपयांचा खर्च आलेला आहे. तर दहा कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून दीड कोटी रुपये खर्चून दिघा रेल्वे स्थानकासमोर स्कायवॉक बांधण्यात येणार आहे.

दिघा रेल्वे स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर दिघावासीय आणि या भागातील औद्योगिक क्षेत्रामध्ये येणार्‍या-जाणार्‍या लाखो कामगारांना ठाण्याकडे जाण्यासाठी ऐरोली स्थानकात जाण्याचा फेरा वाचणार आहे. दिघा स्थानकातून आता थेट ठाणे स्थानकात जाता येणार आहे त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
– संजीव नाईक
माजी खासदार, ठाणे

- Advertisement -

कल्याण जंक्शनला नवी मुंबई जोडणार
भविष्यामध्ये दिघा स्थानकातून एलिव्हेटेड मार्गाच्या माध्यमातून कळवा आणि पुढे कल्याण रेल्वे जंक्शन अशी संलग्नता निर्माण होणार आहे. त्याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. ५१९ करोड रुपयांचा निधी या रेल्वे प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली असून एमआरव्हीसी पहिल्यांदाच अशा प्रकारे एलिवेटेड मार्गाची निर्मिती करीत आहे. एकूण ५१९ करोड निधीमधून ९० करोड रुपये निधी दिघा स्थानकासाठी खर्च करण्यातआलेआहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -