घरनवी मुंबईआईने केली दोन मुलांची गळा दाबून हत्या

आईने केली दोन मुलांची गळा दाबून हत्या

Subscribe

घणसोलीतील थरारक घटना

 

 

- Advertisement -

 

नवी मुंबई: घणसोलीमध्ये निर्दयी आईने स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून केली हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन मुलांची चाकूने हत्या केली, यानंतर तिने स्वत:ही पंख्याला गळफास लावून घेतला, पण पंखा तुटल्याने तिचा जीव वाचला. या महिलेला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवरा बायकोच्या भांडणातून मागील अनेक दिवसांपासून मानसिकतणाखाली वावरणार्‍या पुष्पाने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास पुष्पाने मुलांचा गळा चिरून स्वत:चा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य न झाल्याने तिने स्वत:ला पंख्याला लटकवून घेतले. पण ती खाली पडल्याने आवाज होताच इमारतीतील शेजारी घरी धावत आले. यानंतर घरात चार वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचेे दिसले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी आई आणि मुलांना रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले. तर आईला उपचारासाठी वाशी येथील महानगर पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुलाचा वाढदिवस झाला अन्…
महापालिकेच्या ऐरोली येथील जिजामाता बाल रुग्णालयात मुलांचे मृतदेह दाखल केले आहेत. मुलांचा खून करणार्‍या या विकृत मातेला तपासण्यासाठी वाशीतील महापालिका रुग्णालयात पोलीस घेऊन गेले आहेत. पुष्पा गुर्जर असे निर्दयी मातेचे नाव आहे. मृत मुलांमध्ये ४ वर्षांची मुलगी तर १ वर्षाचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

कुटुंब मूळचे राजस्थानचे
वडील वेणाराम गुर्जर आणि आई पुष्पा गुर्जर हे दोघे मुलगी दिपू , मुलगा राहुल यांच्यासह घणसोली गावातील चिंचाळीमध्ये दशरथ छाया बिल्डिंगमध्ये राहत होते. पुष्पाचा पती वेणाराम याचा आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. वेणाराम गुर्जरचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील असून व्यवसायानिमित्त हे कुटुंबासह नवी मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांनी घणसोलीत कुटुबांसमवेत वास्तव्य करत आपला व्यवसाय सुरु केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -