खोपोली-: कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे अजित पवार गटामध्ये इतर पक्षांतील पदाधिकार्यांनी प्रवेश सुरु केला आहे.विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या प्रवेशाचा ओघ सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पार्टीतील पदाधिकार्यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. (Ajit Pawar group Entry flow begins)
मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी नंदनपाडा गारमाळ येथील असंख्य कार्यकर्ते, महिलांनी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नंदनपाडा गारमाळ येथील किरण हिरवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, महिलांनी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला.
रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्राथमिक स्वरूपात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, सरचिटणीस शरद कदम, जिल्हा उपाध्यक्ष एच. आर. पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, युवक तालुकाध्यक्ष कुमार दिसले, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, शेखर पिंगळे, माजी पं. स. उपसभापती विश्वनाथ पाटील, महिला तालुकाध्यक्षा प्राची पाटील आदी उपस्थित होते.
- येत्या २९ नोव्हेंबरला कर्जतमध्ये अजित पवारांची सभा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या २९ नोव्हेंबरला जाहिर सभा कर्जत येथील पोलिस मैदानावर होत आहे. या सभेला खालापूरातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले आहे. यासंबंधीची माहिती आणि नियोजनासाठी खालापूरातील नव्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या पदाधिकार्यांनी पक्षप्रवेश केला आहे. सभेपुर्वी पक्ष प्रवेशामुळे अजित पवार गटाचे पारडे जड झाले आहे.